वैभवलक्ष्मीमातेला समर्पित व्रत शुक्रवारी केलं जातं. स्त्री आणि पुरुष दोघंही हे व्रत करू शकतात. या व्रतामुळे व्यवसायात वृद्धी होते आणि संपत्तीत वाढ होते. व्रतावेळी श्री यंत्राची पूजा करणं विशेष लाभदायक असतं. वैभवलक्ष्मीच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचा विशेष वापर केला जातो.
व्रताचे नियम
धनप्राप्तीसाठी 8 शुक्रवार देवी लक्ष्मीचं व्रत करा. लक्ष्मीच्या आठ रूपांची पूजा करा किंवा धनलक्ष्मीच्या रूपाची पूजा करा. दिवसभर फक्त पाणी प्या किंवा फळं खा. संध्याकाळच्या वेळीही अन्नाचे सेवन करू नये. मध्यरात्री लक्ष्मीच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावा. “ओम श्री श्रीय नमः” या मंत्राचा 11 माळा जप करा. लक्ष्मीमातेला गुलाबाची फुलं किंवा गुलाबाचं अत्तर अर्पण करा.
advertisement
दिवाळीच्या लक्ष्मीपूजनावेळी या गोष्टी लक्षात ठेवून करा; लक्ष्मीमातेची राहील कृपादृष्टी
पूजेची पद्धत
शुक्रवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. व्रताचा संकल्प घेतल्यानंतर स्वच्छ ताटात मूठभर तांदूळ आणि पाण्याने भरलेले तांब्याचं भांडं ठेवा. हे देवीच्या मूर्तीजवळ ठेवा. देवीला धूप, दिवा, सुगंध आणि पांढरी फुले अर्पण करा. उपवासाच्या दिवशी देवीला खीर अर्पण करावी. त्यानंतर शुक्रवार व्रताची कथा ऐका.
दिवाळीत नरक चतुर्दशीला केलं जातं 'अभ्यंग स्नान', काय आहे धार्मिक महत्त्व?
लक्ष्मीव्रताच्या उद्यापनाची पद्धत
व्रताचं उद्यापन करण्यासाठी वैभवलक्ष्मी व्रतकथा व दक्षिणा तसंच ग्रंथ दान करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर उपवास संपतो. प्रदोषकाळात देवी लक्ष्मीचे व्रत स्थिर ठेवून नंतर समाप्त करायला हवं.
श्रीयंत्राचा वापर
या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा अभ्यासाच्या ठिकाणी उर्ध्वमुख श्रीयंत्राचे चित्र लावा. श्रीयंत्राचे चित्र रंगीत असल्यास उत्तम राहील. श्रीयंत्र अगदी डोळ्यासमोर असेल अशा प्रकारे ठेवा. जिथे जिथे श्रीयंत्र बसवाल तिथे घाण करू नका, त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या.