Diwali 2023: दिवाळीच्या लक्ष्मीपूजनावेळी या गोष्टी लक्षात ठेवून करा; लक्ष्मीमातेची राहील कृपादृष्टी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Diwali Laxmi pujan 2023: हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वांत मोठा आणि महत्त्वाचा सण मानला जातो. दिवाळीत लक्ष्मीपूजन केलं जातं. या पूजनामागे विशिष्ट काही हेतू असतो. जीवनात सुख-समृद्धी यावी यासाठी दिवाळीला लक्ष्मीपूजन केलं जातं. या दिवशी घरासोबतच दुकानं आणि कार्यालयांमध्ये लक्ष्मीमातेची विधिवत पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमातेची विधिवत पूजा करण्यासाठी काही गोष्टी आवश्यकता असते. या वस्तूंचा पूजाविधीत समावेश असेल तर लक्ष्मीची कृपादृष्टी लाभते, असं जाणकार सांगतात. या वस्तूंमध्ये प्रामुख्याने कवड्या, दिवा, मंगल कलश आदींचा समावेश असतो.
दिवाळीच्या शुभपर्वाला काही दिवसात सुरुवात होणार आहे. लक्ष्मीपूजन हा या पर्वातला महत्त्वाचा दिवस मानला जातो. यंदा रविवारी 12 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन आहे. या दिवशी लक्ष्मीमातेची विधिवत पूजा केली जाते. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमाता एका ठराविक कालावधीत पृथ्वीवर भ्रमण करते, असं मानलं जातं. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी या दिवशी घरोघरी लक्ष्मीपूजन केलं जातं. दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात गणपतीसोबत लक्ष्मीची पूजा केली जाते. या संपूर्ण पूजाविधीत काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास लक्ष्मीमातेची कृपादृष्टी प्राप्त होते, असं जाणकार सांगतात.
advertisement
दिवाळीच्या दिवशी मंगल कलशाची विधिवत पूजा करावी. या दिवशी पूजेच्या ठिकाणी जमिनीवर अष्टकोनी कमळ काढून त्यावर मंगल कलश ठेवून त्याची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनापूर्वी पितळ, तांबे, चांदी किंवा सोन्याचा कलश पाण्याने भरून त्यात आंब्याची डहाळी ठेवून त्यावर नारळ ठेवला जातो. कलशावर कुंकवाचं स्वस्तिक काढलं जातं. याशिवाय कलशावर एक धागा बांधला जातो. दिवाळीच्या दिवशी या पद्धतीने कलश ठेवल्यास लक्ष्मीमाता प्रसन्न होते, असं मानलं जातं.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दिवाळीच्या दिवशी अर्थात लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीमातेला नैवेद्य म्हणून फळ, मिठाई आदी अर्पण केला जातो. याशिवाय बत्तासे, लाह्यादेखील लक्ष्मीला अर्पण केल्या जातात. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीमातेला या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं शुभ मानलं जातं. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)