TRENDING:

सावधान! घरात रात्रीच्या वेळी करू नका 'ही' चूक, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम

Last Updated:

घरातील वस्तू आणि दिशा यांचा जीवनावर मोठा प्रभाव असतो, असे वास्तुशास्त्र सांगते. रात्री ओले कपडे बाहेर ठेवल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा त्यात प्रवेश करते. यामुळे घरात...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आपल्या आयुष्यात घराचं खूप महत्त्व असतं. माणसाच्या जीवनात चढ-उतार येतात, पण त्यामागे अनेकदा घरातील काही गोष्टी कारणीभूत असतात. वास्तुशास्त्र हे अशाच गोष्टींचं शास्त्र आहे. घरातील वस्तू, जागेचं नियोजन, वागणूक या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
Wet Clothes at Night
Wet Clothes at Night
advertisement

वास्तुशास्त्रामध्ये ‘वास्तुदोष’ या गोष्टीचा उल्लेख येतो. काही चुकीच्या सवयी, चुकीच्या गोष्टी घरात केल्यामुळे अशा दोषांचं निर्माण होतं आणि त्यामुळे घरात त्रास सुरू होतो. अशा त्रासांपासून वाचण्यासाठी वास्तुशास्त्र काही नियम सांगतं – त्यातलाच एक नियम म्हणजे रात्री ओले कपडे बाहेर ठेवू नयेत.

सूर्यास्तानंतर ओले कपडे बाहेर का ठेवू नयेत?

वास्तुशास्त्रानुसार, सूर्य मावळल्यानंतर वातावरणात नकारात्मक ऊर्जा वाढते. रात्रीच्या वेळी ही ऊर्जा फिरत असते आणि जर ओले कपडे घराबाहेर टाकले असतील, तर अशा कपड्यांमध्ये ही नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती शिरू शकतात. हे कपडे जेव्हा आपण परत घरात आणतो आणि वापरतो, तेव्हा ती नकारात्मक ऊर्जा आपल्यावर परिणाम करू शकते.

advertisement

याचा परिणाम आपल्या आरोग्यावर, आर्थिक स्थितीवर आणि वागणुकीवर होतो. घरात अडचणी वाढतात, पैशांची अडचण होते, सतत मानसिक तणाव जाणवतो आणि घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं होतात. रात्री चंद्राची किरणं जमिनीवर पडतात आणि त्या ओल्या कपड्यांमुळे नकारात्मक ऊर्जा थेट घरात येते, असं मानलं जातं.

फक्त धार्मिक नाही, यामागे वैज्ञानिक कारणंही आहेत!

advertisement

ही फक्त अंधश्रद्धा किंवा धार्मिक बाब नाही, तर यामागे विज्ञान देखील आहे. रात्री हवेमध्ये आर्द्रता जास्त असते आणि त्यामुळे ओले कपडे नीट वाळत नाहीत. हेच कपडे ओलेच राहतात आणि त्यावर बॅक्टेरिया आणि फंगस तयार होतात. असे कपडे वापरल्याने त्वचेवर खाज, अ‍ॅलर्जी, चट्टे असे त्रास होऊ शकतात. इतकंच नाही, तर रात्री फिरणारे कीटक, माशा, झुरळं यांसारखे जीव त्या कपड्यांवर विष्ठा करतात. अशा घाणेरड्या कपड्यांमुळे त्वचेचे विकार, दुर्गंधी आणि सततचा अस्वस्थपणा जाणवतो.

advertisement

काय करायला हवं?

  • ओले कपडे शक्यतो सूर्यप्रकाशातच वाळवावेत.
  • सूर्य मावळल्यावर कपडे बाहेर ठेवणं टाळावं.
  • कपडे आत वाळवण्याची सोय नसेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळीच वाळवायला टाकावेत.

वास्तुशास्त्र आपल्याला नुसते नियम सांगत नाही, तर आपल्या जीवनशैलीत सुधारणा करून सकारात्मकता आणण्याचा सल्ला देतं. त्यामुळे अशा छोट्या छोट्या सवयींवर लक्ष दिलं, तर आपल्या घरात आणि आयुष्यात शांतता आणि सौख्य टिकून राहतं.

advertisement

हे ही वाचा : फ्रिजमध्ये बर्फ जमा होतोय? फाॅलो करा 'या' सोप्या टिप्स; बर्फही निघून जाईल अन् लाइट बिल कमी येईल

हे ही वाचा : धन-संपत्ती-पैसा हवाय? तर घरात 'या' दिशेला ठेवा चांदीचा ग्लास, देवी लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद

मराठी बातम्या/अध्यात्म/
सावधान! घरात रात्रीच्या वेळी करू नका 'ही' चूक, अन्यथा भोगावे लागतील गंभीर परिणाम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल