Somvati Amavashya: सोमवती अमावस्येला करा हे उपाय, पितृदोष होईल दूर! घरात नांदेल सुख समृद्धी
तुळशीची पाने, मुळे, मंजिरी आणि लाकूड देखील ज्योतिषीय उपायांमध्ये वापरले जाते. पण, आपल्याला कदाचित माहीत नसेल की, तुळशीचे रोप असे अनेक संकेत देते, जे एखाद्या अप्रिय घटनेचे संकेत असतात. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्रकुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती देत आहेत.
advertisement
धन-समृद्धिच्या प्राप्तीसाठी : जर तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर रोज तुळशीच्या रोपाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी दिवा लावा. यामुळे पैसे मिळवण्याचे सर्व मार्ग खुले होतात. असे रोज केल्यास धनाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील, माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील.
जर तुमच्या घरात तुळशी असेल आणि तुम्ही तिच्याजवळ नियमित बसत असाल तर तुम्ही अस्थमा नावाच्या आजारापासून मुक्ती मिळवू शकता.
पैशांची चणचण भासतेय का, आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चमचा दही मिसळा, धनलाभ होणारच
तुळशीमुळे संकटाचे संकेत कसे मिळतात - ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुमच्या घरात तुळस लावली असेल आणि ती सुकायला लागली असेल तर समजा तुमच्या घरावर कुठलीतरी संकटे येणार आहेत. तुळशीची नीट काळजी घेतली असतानाही ती सुकत असेल तर अडचणी प्रसंग येऊ शकतो. आपत्ती येण्याआधी ती नेहमीच सुकते, असे मानले जाते
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)