घरात देव्हाऱ्याची योग्य दिशा का महत्त्वाची - ईस्ट नॉर्थ ईस्ट ही दिशा आनंद आणि प्रसन्नतेची मानली जाते. देव्हारा या दिशेला असल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सतत सुरू राहतो. या ठिकाणी पूजा करताना तुम्हाला एखाद्या प्रसिद्ध मंदिरात बसल्याचा अनुभव घरामध्येच मिळू शकतो. यामुळे मनाला खोलवर समाधान मिळते आणि डोळ्यांत आनंदाश्रू येऊ शकतात.
advertisement
ईशान्य दिशेला देव्हारा असण्याचे फायदे -
पूजेच्या वेळी लक्ष केंद्रित होते आणि दिवसभराचा ताण दूर होतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि एकमेकांबद्दलची समज वाढते. घरात सकारात्मक लहरी वाढतात, ज्याचा चांगला परिणाम आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर होतो. या दिशेला तोंड करून पूजा केल्याने जीवनात नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळते आणि यशाच्या संधी उपलब्ध होतात.
धनु मकर कुंभ मीन राशींचे वार्षिक राशीफळ; अर्थपूर्ण प्रगतीकडे वेगात वाटचाल पण..
देव्हारा बनवताना लक्षात घेण्यासारख्या गोष्टी -
देव्हाऱ्याची उंची अशी असावी की, तुम्ही देवाच्या मूर्तीकडे सहजपणे पाहू शकाल. पूजेचे साहित्य नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठिकाणी ठेवावे. दररोज ईस्ट नॉर्थ ईस्टच्या दिशेला तोंड करून पूजा करावी. देव्हाऱ्याची जागा विद्युत उपकरणे आणि गोंगाटापासून लांब असावी. घरात देव्हारा असणं ही एक धार्मिक परंपरा आहेच शिवाय त्यामुळे घरातील लोकांसाठी मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी गरजेचे आहे. ईस्ट नॉर्थ ईस्ट दिशेला देव्हारा ठेवल्याने घरामध्ये आनंदाची आणि सकारात्मक ऊर्जेची भरभराट राहते. ही दिशा तुम्हाला ईश्वराच्या अधिक जवळ नेते आणि जीवनात समाधान भरून देते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जानेवारी महिना कोणासाठी लकी?
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
