सहस, सोपा अन् खर्चाशिवाय विधी
आज आपण अशा एका वास्तुदोषावरील उपायाबद्दल बोलणार आहोत, जो खूप सोपा आहे. यासाठी तुम्हाला कोणतीही लांबलचक पूजा किंवा विधी करायची गरज नाही. या उपायाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही, आणि यासाठी कोणत्याही पंडित किंवा तज्ञांच्या मदतीची आवश्यकता नाही.
advertisement
हा वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त एक फोटो लागेल. हा फोटो भगवान शिवशंकर आणि माता अन्नपूर्णा यांचा असावा. या फोटोमध्ये भगवान शंकर, माता अन्नपूर्णेकडून आपल्या कपाळपात्रात (म्हणजे त्यांच्या भांड्यात) भिक्षा घेताना दिसायला हवेत. हा फोटो खूप शुभ मानला जातो. हा फोटो घरात लावल्याने केवळ स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत नाही, तर घरात सुख, शांती आणि समृद्धी देखील येते.
हा उपाय असा करा
- हा फोटो तुमच्या स्वयंपाकघराच्या दरवाजाच्या आतील बाजूस लावा.
- फोटो स्पष्ट आणि पूर्ण दिसणारा असावा.
- रोज या फोटोकडे पाहताना मनात भगवान शिव आणि माता अन्नपूर्णा यांचे स्मरण करा.
आता प्रश्न पडेल की, हा उपाय किती प्रभावी ठरेल? या फोटोमागे खूप खोल प्रतीकात्मक अर्थ दडलेला आहे. भगवान शंकर, ज्यांना सृष्टीचे निर्माते किंवा संहाराचे देवता मानले जाते, ते जेव्हा माता अन्नपूर्णेकडून अन्न भिक्षा म्हणून घेतात, तेव्हा यातून अन्नाचे महत्त्व किती मोठे आहे, हे दिसून येते. माता अन्नपूर्णा तर अन्न आणि समृद्धीची देवी म्हणून ओळखली जाते. असे मानले जाते की, हा फोटो स्वयंपाकघरात लावल्याने घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही आणि यासोबतच वास्तुदोष देखील हळूहळू कमी होतात.
हे ही वाचा : Astrology : बुध ग्रह 6 जूनला करतोय राशीबदल; 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार, होणार मालामाल!
हे ही वाचा : Horoscope Today: जूनआधीच वृश्चिक आणि मीनसाठी 24 तास संकटांचे, एक चूक पडेल महागात, तुमचं आजचं राशीभविष्य