जिल्ह्यातील कर्जतचे शेतकरी राधाकिसन डोंगरे यांनी आपल्या सहा एकर शेतात तुरीच्या मुन्नी या वाणाची लागवड केली होती. परंतु, फेब्रुवारी महिना उजाडला तरीदेखील या वाणाच्या तुरीला शेंगा लगडल्या नाहीत. गट क्रमांक २२३ मध्ये तब्बल ७ एकर शेतात त्यांनी या वाणाची लागवड केली आहे. याच शेतात लावलेल्या गोदावरी वाणाला चांगल्या शेंगा लगडल्या आहेत. त्यामुळे बियाणे कंपनीने बोगस बियाणे दिल्यानेच माझे 4 ते 5 लाखांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीने त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी राधाकिसन डोंगरे यांनी केली आहे.
advertisement
सोन्यापेक्षा भारी दिसणारी ज्वेलरी फक्त 100 रुपयांपासून, लग्नात सगळे पाहतच राहतील, इथं करा खरेदी!
18 जून रोजी सहा फुटाच्या अंतरावर या वाणाची लागवड केली होती. या पिकाला दोन वेळा फवारणी तर तीन वेळा रासायनिक खत दिले तरी देखील पिकाला शेंगा लागत नव्हत्या. तेव्हा या वाणातच समस्या असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही याची कृषी विभागाकडे तक्रार केली. कृषी विभागाने पंचनामे केला असून लवकरच भरपाई मिळेल असे सांगितले. परंतु, माझे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण नुकसानभरपाई मिळायला पाहिजे अशी आग्रही मागणी डोंगरे यांनी केली.





