रांगोळी काढण्यामागे प्राचीन परंपरा आणि काही धार्मिक, ऐतिहासिक कारणं आहेत. रांगोळीची परंपरा हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे, असं मानलं जातं. तसंच रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम आणि सीता अयोध्येत परतल्यावर अयोध्येतल्या नागरिकांनी घराच्या दारासमोर रांगोळ्या काढून, दिवे प्रज्ज्वलित करून आनंदोत्सव सुरू केला होता. त्यामुळे दिवाळीला दिव्यासह रांगोळीला विशेष महत्त्व दिलं जातं. पूर्वी धान्य आणि पिठाचा वापर करून रांगोळी तयार केली जात असे; मात्र आता रांगोळी तयार करण्यासाठी विविध घटकांचा वापर केला जातो.
advertisement
भाग्यवान लोकांना स्वप्नात या गोष्टी दिसतात! दिवाळीत नशीब चमकण्याचे ते संकेत
सणासुदीला, विशेषतः दिवाळीला घरासमोर रांगोळी काढण्याची प्राचीन परंपरा आहे. प्रामुख्याने हाताने रांगोळीची वैविध्यपूर्ण डिझाइन्स काढली जातात. तसंच रांगोळी काढण्यासाठी हायटेक तंत्राचाही वापर केला जातो. काही पुरुष आणि महिला अत्यंत कलात्मक पद्धतीने रांगोळी काढतात. रांगोळी काढण्यामागे खास परंपरा आहे. भारतीय ऐतिहासिक दृष्टिकोनातून असं मानलं जातं, की भारतात रांगोळीचं आगमन मोहेंजोदडो आणि हडप्पा संस्कृतीशी जोडलं गेलं आहे. या दोन्ही संस्कृतीत अल्पना याबाबतचे संदर्भ दिसून येतात. वात्स्यायनाच्या कामसूत्रात वर्णन केलेल्या चौसष्ट कलांपैकी अल्पना ही कला मानली जाते. रांगोळीचा मोहेंजोदडोशी संबंध असण्याचं एक कारण बंगालच्या आधुनिक लोककलेशी संबंधित आहे.
दिवाळीसाठी रांगोळीच्या सुंदर आणि सोप्या डिझाईन्स पाहा
लोकश्रद्धेच्या आधारे असं मानलं जातं की, लंकापती रावणाचा वध केल्यानंतर जेव्हा भगवान श्रीराम सीतेसोबत 14 वर्षांचा वनवास संपून अयोध्येत परतले, तेव्हा अयोध्येतल्या नागरिकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. यासाठी अयोध्येतल्या नागरिकांनी घराची साफसफाई करून घराच्या प्रवेशद्वाराजवळ, तसंच घराच्या अंगणात रांगोळ्या काढल्या होत्या.
संपूर्ण अयोध्या दिव्यांनी उजळून निघाली होती. तेव्हापासून दर वर्षी दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक घरासमोर रांगोळ्या काढण्याची परंपरा सुरू झाली. पूर्वीच्या काळी पीठ, तांदूळ, हळद, डाळ आणि बियांपासून रांगोळी तयार केली जाई. ही रांगोळी खूप शुभ मानली जात असे.
या राशींच्या लोकांना दिवाळी भाग्य उजळवणारी! शनिकृपेनं नोकरी-व्यवसायात लाभाचे योग
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
