कुलदैवत -
कुटुंबाच्या म्हणजेच कुळाच्या देवाला कुलदैवत म्हणतात. पूर्वज आणि अनेक पिढ्या खूप काळापासून ज्यांची पूजा करत असतात, त्यांना कुलदैवत म्हणतात. त्याबरोबरच कुलदैवतामार्फत कुळातील लोक देवता संदेश देत असत किंवा पूजा देवापर्यंत पोहोचवत असत. घरातील कोणत्याही खास प्रसंगी कुलदैवताचं स्मरण करून त्यांच्या ठिकाणी जाऊन त्याची पूजा-अर्चना करून त्यांना आमंत्रित केलं जातं. प्रत्येक कुळात वेगवेगळे देवी-देवता असतात. याचबरोबर कुलदैवत किंवा कुलदेवी वंशाचे म्हणजे कुळाचे रक्षक मानले जातात.
advertisement
ग्रामदेवता -
प्रत्येक गावात एक देव असतो, ज्याची पूजा संपूर्ण गावातील लोक करतात. गाव आणि समाजाच्या रक्षणासाठी ग्रामदेवता असतात. त्याच्या पूजेत गावातील लोक सहभागी होतात. याच ग्रामदेवतांचा वार्षिक उत्सव उरूसही साजरा केला जातो. कुटुंबं पिढ्यानपिढ्या वाढत असूनही प्रत्येकजण ग्रामदैवताचीच पूजा करतात.
गुप्तपणे करतात या स्तोत्राचे पठण; जे हवं तसं जुळून येतं, चमत्कारिक परिणाम दिसतो
इष्ट देवता -
हिंदू धर्मात 33 कोटी देवी-देवता आहेत. पण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या देवी-देवतांची पूजा करते. इष्टचा अर्थ प्रिय असा होतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आपला आवडता देव असतो, ज्याची ती पूजा करते. त्या देवतेला इष्ट देवता म्हणतात. इष्ट देवता नेहमी मार्गदर्शन करतात आणि रक्षणही करतात.
काही केल्या अभ्यासाला बसत नाही, लक्ष देत नाही? मुलाची एकाग्रता वाढवण्यासाठी उपाय
पूजेत सर्वांत आधी केले जाते देवांचे स्मरण -
घरी किंवा कुठेही कोणतीही पूजा असेल तर सर्वांत आधी गणपतीचं आणि देवी-देवतांचे स्मरण केलं जातं. कारण देवी-देवतांची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य पूर्ण होत नाही. याचबरोबर कोणत्याही पूजेमध्ये गुरुजी लोकांना कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्ट देवता यांचे स्मरण करण्यास सांगतात. कारण कोणत्याही शुभकार्यात सर्व देवतांची पूजा आणि त्याचं स्मरण करणं आवश्यक असतं. या देवतांचं स्मरण करण्याचा अर्थ असतो की आपण पूजा करताना त्यांची आठवण करत आहोत. तसंच काही देवतांना आवाहन करून पूजेसाठी बोलवलंही जातं. त्याशिवाय पूजा संपन्न होत नाही.