अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी
ज्योतिषशास्त्रानुसार, हाताच्या अंगठ्याखाली 'शुक्र पर्वत' असतो. ज्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात सुख-सुविधा, प्रेम आणि ऐश्वर्य हवे आहे, त्यांनी अंगठ्यात चांदीची अंगठी घालणे अत्यंत शुभ असते. यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो आणि मनाला शांती देणारा चंद्र ग्रह देखील सकारात्मक फळे देतो.
करंगळीमध्ये चांदीची अंगठी
ज्या व्यक्तींना खूप राग येतो किंवा ज्यांना आपली संवादशक्ती सुधारायची आहे, त्यांनी करंगळीत चांदीची अंगठी घालावी. यामुळे बुध आणि चंद्राची कृपा प्राप्त होते, बुद्धी तल्लख होते आणि आर्थिक समस्या दूर होतात.
advertisement
अनामिका किंवा तर्जनी बोट
अनामिका बोटात चांदीची अंगठी घातल्याने सूर्य आणि चंद्राची शक्ती मिळते, ज्यामुळे समाजात मान-सन्मान वाढतो. तर तर्जनीमध्ये चांदी घालणे गुरु ग्रहाचे दोष दूर करण्यास मदत करते. मात्र, तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही बोटात अंगठी घालणे टाळावे.
योग्य दिवसाची निवड
चांदी ही चंद्राशी संबंधित आहे, म्हणून ती धारण करण्यासाठी सोमवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. तसेच शुक्राच्या कृपेसाठी शुक्रवारी देखील ही अंगठी घालता येते. शनिवारी किंवा राहूच्या नक्षत्रात नवीन चांदीची अंगठी घालणे टाळावे, कारण यामुळे ग्रहांचे नकारात्मक फळ मिळू शकते.
सांधा नसलेली अंगठी
असे मानले जाते की, ज्योतिषीय फायद्यांसाठी चांदीची अंगठी ही 'जोड' नसलेली असावी. जोड असलेल्या अंगठीपेक्षा अखंड गोलाकार अंगठी ग्रहांची ऊर्जा अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेते आणि त्याचे परिणाम लवकर दिसून येतात.
आरोग्यदायी फायदे
चांदी हा धातू शरीरातील जलतत्व संतुलित ठेवतो. अंगठ्यात चांदीची अंगठी घातल्याने हाडे मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. ज्यांना कफ किंवा सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी चांदी वरदान ठरते.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
