नर्मदापुरम : हिंदू धर्मात सूर्यास्तानंतर कोणत्याही व्यक्तीचा अंतिम संस्कार केला जात नाही. जर एखाद्या व्यक्तीचा रात्री मृत्यू झाला तर त्याचे अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी केले जातात. पण असे नेमकं का केले जाते, याबाबत गरुड पुराणात या विषयाचे सविस्तर वर्णन केले आहे.
ज्योतिषी पं. पंकज पाठक यांच्या मते, सनातन धर्मात मनुष्याच्या जन्मापासून त्याच्या मृत्यूपर्यंत एकूण 16 विधींचा उल्लेख आहे. अंत्यसंस्कार हा या 16 संस्कारांपैकी एक मानला जातो. शास्त्रात अंत्यसंस्काराची प्रक्रिया काय असेल हे सांगितले आहे. पाठक यांनी सांगितले की, शास्त्रीय मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार करणे निषिद्ध मानले जाते.
advertisement
ज्योतिषाचार्य पं. पंकज पाठक हे सांगतात की, गरुण पुराणात मृतदेहाच्या अंतिम संस्काराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीचा रात्रीच्या वेळी मृत्यू झाला तर त्याचे अंतिम संस्कार धर्मानुसार दुसऱ्या दिवशीच केले जाऊ शकतात. असे मानले जाते की, सूर्यास्तानंतर मृत शरीरावर अंत्यसंस्कार केल्यास त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला मृत्यूनंतर पुढे दुःख भोगावे लागते. याशिवाय पुनर्जन्मानंतर त्या व्यक्तीच्या कोणत्याही अवयवात दोष असू शकतो. या धार्मिक मान्यतांमुळे सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करण्यास मनाई आहे.
घागर घेऊन चितेची प्रदक्षिणा का करावी लागते?
अंत्यसंस्काराच्या मान्यतांमध्ये आणखी एका गोष्टीचा समावेश आहे. ते म्हणजे, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, अंत्यसंस्काराच्या वेळी, एक घागर पाण्याने भरली जाते, त्यात एक छिद्र केले जाते आणि चितेवर ठेवलेल्या मृतदेहाची परिक्रमा केली जाते. यानंतर मागून वार करून भांडे फोडले जातात. या संदर्भात पौराणिक मान्यता आहे की, असे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्याचा त्याच्या शरीरापासून मोहभंग होतो.
अंमली पदार्थांचे व्यसन, स्वतःच्या शेतातच गांजाची लागवड, असा जुगाड केली की पोलिसांनाही बसला धक्का
यामागे आणखी एक गुपित सांगितले आहे की, मानवी जीवन हे घागरीसारखे आहे. या घागरीत भरलेले पाणी म्हणजे माणसाचा काळ असे वर्णन केले आहे. जेव्हा घागरीतून पाणी टपकते, म्हणजे वयानुसार पाणी प्रत्येक क्षणी कमी होत जाते. शेवटी माणूस सर्वस्वाचा त्याग करुन जीवात्मामध्ये प्रवेश करतो.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती ही, राशी-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांसोबत साधलेल्या संवादावर आधारित आहे. यामध्ये सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.