अंमली पदार्थांचे व्यसन, स्वतःच्या शेतातच गांजाची लागवड, असा जुगाड केली की पोलिसांनाही बसला धक्का
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
एक व्यक्तीला गांजाचे व्यसन होते. व्यसनाच्या आहारी गेलेल्या या व्यक्तीने चक्क गांजाची शेती सुरू केली.
शक्ति सिंह, प्रतिनिधी
कोटा : देशात अनेक जणांना विविध प्रकारची व्यसने आहे. कुणाला दारूचे, कुणाला सिगारेटचे तर कुणाला गांचाचेही व्यवसन आहे. त्यामुळे जेव्हा या व्यसनाधीन लोकांना आपले व्यसन पूर्ण करता येत नाही, तेव्हा ही लोकं आपापाल्या पद्धतीने विविध प्रकारे व्यसन पूर्ण करतात. त्यासाठी वेगवेगळे जुगाड करताना दिसतात. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
advertisement
एक व्यक्तीला गांजाचे व्यसन होते. व्यसनाच्या आहारी गेलेल्या या व्यक्तीने चक्क गांजाची शेती सुरू केली. राजस्थानमधून ही घटना समोर आली आहे. गांजाची शेती सुरू करून त्या व्यक्तीला रोज इकडून तिकडे व्यसनाचा सामान आणण्यासाठी ब्रेक घ्यायचा होता. एकाच वेळी शेती करून त्याला काही महिने किंवा वर्षांसाठी गांजाचा जुगाड करायचा होता. त्यामुळे गांजाच्या लागवडीसाठीही व्यक्तीने जो जुगाड केला, तो पाहून सर्वच जण थक्क झाले.
advertisement
1900 रोपे जप्त -
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील या घटनेने खळबळ उडाली आहे. याठिकाणी मोहरीच्या शेतात गांजाची शेती केली जात होती. पोलीस अधिकारी रमेश चंद मीणा यांनी सांगितले की, मिळालेल्या माहितीच्या आधारे जिल्हा विशेष पथकाने आणि पगारिया पोलिसांनी शेतातून 1900 गांजाची रोपे ताब्यात घेतली. त्यांचे वजन 167.9 किलोग्रॅम आहे. तसेच या प्रकरणातील आरोपी व्यसनी व्यक्ती विक्रम सिंह सोंधिया याला अटक करण्यात आली आहे. चहूकडे मोहरीच्या शेतीत मधोमध गांजाची शेती केली जात असताना पोलिसांनाही धक्का बसला. याप्रकरणी आरोपीविरोधात अंमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
मोहरीच्या शेतात गांजाची शेती -
पोलिसांनी सांगितले की, आरोपीला गांजाचे व्यसन होते. त्याने आपल्या शेतातच मोहरीच्या पिकात गांजाची शेती सुरू केली होती. तसेच ही गोष्ट अतिशय गुप्त ठेवली होती. कुणालाही याबाबत माहिती पडू दिले नाही. मात्र, जेव्हा गांजाची रोपे येऊ लागली तेव्हा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. यानंतर पगारिया पोलीस ठाणे हद्दीत ही कारवाई करण्यात आली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
Location :
Rajasthan
First Published :
February 23, 2024 10:50 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
अंमली पदार्थांचे व्यसन, स्वतःच्या शेतातच गांजाची लागवड, असा जुगाड केली की पोलिसांनाही बसला धक्का