भारताच्या चार अद्वितीय आणि अत्यंत महत्त्वाच्या भूवैज्ञानिक सरोवरांपैकी लोणार, रामगड, लूना आणि ढला या सरोवरांचा थेट संबंध अंतराळाशी आहे. या सर्व सरोवरांची निर्मिती लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळलेल्या उल्कापिंडांच्या भीषण टक्करांमुळे झाली आहे. या दुर्मिळ घटनांनी पृथ्वीचा भूभाग कायमस्वरूपी बदलून टाकला आणि एकाच वेळी विज्ञान, इतिहास आणि खगोलशास्त्र यांचा अनोखा संगम उभा केला.
advertisement
लोणार सरोवर – महाराष्ट्र
लोणार हे भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेले एकमेव उल्कापिंड-निर्मित क्रेटर सरोवर आहे. अंदाजे 50,000 ते 5,70,000 वर्षांपूर्वी एका प्रचंड वेगाने आलेल्या उल्कापिंडाच्या धडकेमुळे हे सरोवर तयार झाले. येथे अत्यंत उच्च दाबात तयार होणारा "मास्केलिनाइट" (Maskelynite) हा दुर्मिळ खनिज मोठ्या प्रमाणावर आढळतो, जो या सरोवराच्या अंतराळीय उत्पत्तीचे थेट पुरावे देतो. हे सरोवर आपली क्षारीय आणि खारी रचना, तसेच अद्वितीय परिसंस्था यासाठी जगभरातील संशोधकांना आकर्षित करते.
Life Science: शरीरातील थक्क करणारा चमत्कार, दर 28 दिवसांत तयार होते नवी Skin
रामगड क्रेटर – राजस्थान
राजस्थानातील रामगड क्रेटर हे पृथ्वीवर झालेल्या धूमकेतू किंवा उल्कापिंडांच्या टक्करांचे जिवंत उदाहरण आहे. जरी लाखो वर्षांच्या अपरदनामुळे (Erosion) त्याची बरीच रचना झिजली असली, तरी संशोधकांना येथे शॉक्ड क्वार्ट्ज आणि इम्पॅक्ट ब्रेशिया यांसारखे प्रभावी भूवैज्ञानिक पुरावे मिळतात. क्रेटरच्या आत असणारे पार्वती कुंड हे बहुधा या प्राचीन अंतराळीय टक्कर-साइटचाच भाग असावे.
लूना क्रेटर – गुजरात
कच्छ प्रदेशातील लूना क्रेटर हा वैज्ञानिक संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठिकाण आहे. येथे ग्लासी इम्पॅक्ट फ्रॅगमेंट्स, तसेच अत्यंत उच्च दाबात तयार होणारी कोएसाइट व स्टिशोवाइट ही खनिजे आढळतात. जी मोठ्या उल्कापिंडाच्या टक्करांशिवाय तयारच होऊ शकत नाहीत. या टक्करांच्या परिणामस्वरूप येथे साधारण 1 चौ.किमीची एक उथळी आणि ऋतूमानानुसार आटणारे सरोवर तयार झाले आहे.
कोलेस्टेरॉलच्या रुग्णांची काळजी मिटली, Heart Attackचा धोका कमी करणारे औधष
ढला क्रेटर – मध्य प्रदेश
मध्य प्रदेशातील ढला क्रेटर हे भारतातील सर्वात मोठ्या प्रभाव-स्थळांपैकी एक असून, त्याचा व्यास सुमारे 11 किलोमीटर इतका आहे. हे 2 अब्ज वर्षांहून अधिक जुने असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे. ज्यामुळे हे आशियातील सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचे उल्कापिंड निर्मित स्थळ बनते. प्रचंड अपरदनामुळे येथे आता स्थायी सरोवर दिसत नाही, पण त्याचे विशाल स्वरूप आणि प्राचीन उत्पत्ती हे पृथ्वीवरील ब्रह्मांडीय इतिहासाचे अनमोल दस्तऐवज आहेत.
दुर्मिळ परिसंस्था आणि विज्ञानाचा संगम
विशेषतः लोणार सरोवरची परिसंस्था अत्यंत अनोखी असून, त्यातील खारा व क्षारीय पाणी, दुर्मिळ सूक्ष्मजीव, तसेच प्रभाव-निर्मित भूवैज्ञानिक रचना यामुळे ते पृथ्वीवरील एक नैसर्गिक प्रयोगशाळा बनले आहे. ही सर्व क्रेटर स्थळे केवळ भूवैज्ञानिक उत्सुकतेचा विषय नाहीत, तर पृथ्वीने लाखो वर्षांतील अंतराळीय आघातांना कसे स्वीकारले व त्यानुसार कशी जुळवून घेतली, याचे जिवंत उदाहरण आहेत.
Life Science: शरीराचं सर्वात पॉवरफुल नॅचरल टूल, 5 कोटी वेळा तुमचं आयुष्य वाचवतं
विविधता आणि आव्हाने
भारतात ढलासारखी अनेक प्रभाव-स्थळे आता सरोवररहित झाली आहेत. काही ठिकाणी पाणी ऋतूनुसार साचते किंवा फक्त आर्द्रभूमी (Wetlands) स्वरूपात अस्तित्वात असते. त्यामुळे भारतातील या चार सरोवरचे अस्तित्व हे भूवैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण मानले जाते.
