नवी दिल्ली: कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अलीकडील एका अभ्यासानुसार ‘एन्लिसिटाइड’ (Enlicitide) नावाची नवीन औषध गोळी स्वरूपात उपलब्ध असून, ती वाईट कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL 58 टक्क्यांपर्यंत कमी करू शकते, अशी महत्त्वाची माहिती मिळाली आहे.
advertisement
मर्क (Merck) कंपनीने तयार केलेल्या या औषधाबद्दल डॉक्टरांमध्ये मोठी उत्सुकता आहे, कारण आतापर्यंत अशा प्रकारची औषधे प्रामुख्याने इंजेक्शनद्वारे दिली जात होती. ‘अमेरिकन मेडिकल असोसिएशन’ (JAMA) मध्ये प्रकाशित झालेल्या या स्टडीनुसार, ही गोळी सोपी, सोयीस्कर आणि प्रभावी पर्याय ठरू शकते.
ही स्टडी टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटने केली असून 17 देशांतील 59 मेडिकल सेंटर्समधील 303 जणांना या संशोधनात समाविष्ट करण्यात आले. हे सर्व रुग्ण ‘हेटेरोजायगस फॅमिलियल हायपरकोलेस्टेरोलेमिया’ (HeFH) या आनुवंशिक आजाराने ग्रस्त होते, ज्यात लहानपणापासूनच LDL खूप जास्त असतो आणि कमी वयात हृदयविकाराचा धोका वाढतो.
Life Science: शरीराचं सर्वात पॉवरफुल नॅचरल टूल, 5 कोटी वेळा तुमचं आयुष्य वाचवतं
भारतामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने हे औषध महत्त्वाचे ठरू शकते. कारण जास्त LDL हा हृदयविकार आणि स्ट्रोकचा मोठा कारणीभूत घटक मानला जातो. ICMR आणि ‘मद्रास डायबिटीज रिसर्च फाउंडेशन’च्या संयुक्त अभ्यासानुसार, देशातील 81 टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये लिपिडशी संबंधित समस्या आढळतात, तर सुमारे 21 टक्के भारतीयांचे LDL वाढलेले आहे. हा आकडा जवळपास 18.5 कोटी लोकसंख्येच्या बरोबरीचा आहे.
या पार्श्वभूमीवर कार्डियोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियाने (CSI) 2024 मध्ये पहिल्यांदाच लिपिड व्यवस्थापनाचे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यानुसार डायबिटीज, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकाराच्या जोखमीतील व्यक्तींनी LDL 70 mg/dL पेक्षा कमी ठेवणे आवश्यक आहे. स्टॅटिन ही मुख्य औषधे असली तरी 20 टक्के रुग्ण त्यांच्याद्वारेही अपेक्षित पातळी गाठू शकत नाहीत किंवा दुष्परिणामांमुळे नियमित औषधे घेणे शक्य होत नाही.
नवीन औषध कसे काम करते?
भारतामध्ये PCSK9 औषधे प्रभावी असूनही फार लोकप्रिय नाहीत, कारण त्यांची किंमत अत्यंत जास्त आहे. उदा: इंक्लिसिरनचे वार्षिक खर्च एक लाख रुपयांपेक्षा अधिक. शिवाय इन्शुरन्समध्ये कमी कव्हरेज आणि स्वस्त व सहज उपलब्ध असलेले स्टॅटिन्स हेच लोकांची पहिली पसंती ठरतात. अशा परिस्थितीत गोळी स्वरूपातील नवीन प्रभावी औषधाचा पर्याय रुग्णांसाठी भविष्यात मोठा बदल घडवू शकतो.
