या मॅचच्या पहिल्या दिवशी 20 विकेट्स पडल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या सेशनचा खेळ संपण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग संपली. ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या इनिंगमध्ये ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक 46 रन केले, तर कॅप्टन स्टीव्ह स्मिथ 24 रनवर नाबाद राहिला. आयपीएल ऑक्शनमध्ये मोठी बोली लागलेल्या कॅमेरून ग्रीनने 19 रनचे योगदान दिले. याआधी इंग्लंडने टॉस जिंकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता.
advertisement
मॅचमध्ये इंग्लंडच्या बॉलर्सनी दुसऱ्या दिवशी जबरदस्त कमबॅक केले. कॅप्टन बेन स्टोक्सने 3 तर ब्रायडन कार्सने 4 बॅटर्सना आऊट करून ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला खिंडार पाडले. पहिल्या इनिंगमध्ये जोश टंगने 5 विकेट्स घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या इनिंगमध्ये मायकल नेसरने 35 आणि उस्मान ख्वाजा याने 29 रन केले होते. आता सलग तीन मॅच गमावलेला इंग्लंडचा संघ ही मॅच जिंकून आपली प्रतिष्ठा राखतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
दरम्यान, इंग्लंडने दुसऱ्या डावात चांगली सुरूवात केली असून दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक बॅटिंगचं प्रदर्शन केलं. पण मिचेल स्टार्कने बेन डकेट याला 34 वर आऊट केलं अन् पहिली विकेट पडली. त्यामुळे आता सामना रोमांचक स्थितीत आला आहे.
