गंभीरने टीम इंडियामध्ये राजकारण केलं
गौतम गंभीर राजकारणात होता. तिथं त्याला काहीही करता आलं नाही. पण गंभीरने तेच राजकारण टीम इंडियामध्ये उभं केलं. ज्या विराटबद्दल खुलेआम बोलत होते, त्यांना संधी विराटविरुद्ध शडयंत्र रचण्याचा, असं अहमद शेहजाद म्हणाला. यावेळी त्याने विराटच्या भावाचं उदाहरण देखील दिलं. विराट कोहलीच्या भावाने ट्विट केलं होतं. माझ्या भावासोबत असं असं झालंय पण नंतर ते ट्विट डिलिट करण्यात आलं. त्यामुळे गौतम गंभीरच्या पॉलिटिक्सने टीम इंडियाचा चेहरा खराब केलाय, असंही अहमद शेहजाद म्हणाला.
advertisement
अहमद शहजाद काय म्हणाला?
एका पाकिस्तानी टीव्ही शोमध्ये साऊथ अफ्रिकेच्या पराभवानंतर गौतम गंभीर याच्याकडे बोट दाखवताना अहमद शहजाद म्हणाला की, जर प्लेइंग इलेव्हनमध्ये योग्य खेळाडूंची निवड झाली नाही, तर भारतीय संघ फेव्हरिट असूनही जेतेपदापासून दूर राहील. खराब फॉर्म असूनही अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा अजूनही प्लेइंग इलेव्हनमध्ये का आहेत? हे असे प्रश्न देखील त्याने यावेळी उपस्थित केले.
पाकिस्तानी खेळाडूंवर टीका
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं राजकारण कोणत्याही सिनेमापेक्षा कमी नाही. पाकिस्तानने आधी आपल्या देशाच्या क्रिकेटबद्दल विचार करावा, अशी टीका सोशल मीडियावरून पाकिस्तानी खेळाडूंवर होताना दिसतीये.
