काय म्हणाले कपिल देव?
30 वर्षापूर्वी जे गोल्फ खेळत होते, त्यात जे 260 शॉट्स मारायचे, तेव्हा तो खूप मोठा खेळाडू आहे असं मानलं जात होतं. आता गोल्फमध्ये कुणीही तेवढा स्कोर करतो. काळ बदलला आहे. बॉडी देखील तशी चेंज होते. नक्कीच बुमराह आपल्यासाठी स्पेशल बॉलर आहे. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की, बुमराह एवढं लांबपर्यंत इंटरनॅशनल क्रिकेट खेळू शकेल. तो त्याच्या बॉडीवर खुप स्ट्रेस घेतो, त्यामुळे तो जास्त दिवस क्रिकेट खेळेल, असं वाटलं नव्हतं असं कपिल देव म्हणाले आहेत.
advertisement
एक ना एक दिवस जायचंय - कपिल देव
प्रत्येकाची आपापली बॉडी आहे, त्यानंतर ते वर्कलोड मॅनेज करतात. त्याने ती सुस्थितीत ठेवली, त्यामुळे नक्कीच त्याचं कौतूक केलं पाहिजे, असंही कपिल म्हणाले आहेत. आपण म्हणतो की, विराट असो रोहित असो सचिन असो.. यांनी निवृत्ती घेतली नाही पाहिजे, पण प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंच आहे, असं कपिल देव म्हणाले आहेत.
बुमराह मोठा निर्णय घेणार?
दरम्यान, एक प्रेक्षक आणि खेळाचा प्रेमी म्हणून मी म्हणेन की त्याने अजिबात निवृत्त होऊ नये, पण एक दिवस प्रत्येकाला जावेच लागते, असं म्हणत कपिल देव यांनी देखील बुमराहच्या निवृत्तीचं अप्रत्यक्षपणे समर्थन केलं आहे. क्रिकेटच्या वेगवेगळ्या युगांची तुलना करता येत नाही आणि आधुनिक क्रिकेटपटू वेगळ्या पद्धतीने खेळतात, असंही कपिल देव म्हणातात. त्यामुळे आता बुमराह मोठा निर्णय घेणार का? असा सवाल विचारला जात आहे.