गुजरातच्या आर्या देसाईने टी20 क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला आहे.आर्याने टी20 मध्ये 81 बॉलमध्ये 193 धावांची वादळी खेळी केली होती. आर्याने ही कामगिरी करताना वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे. सूरत क्रिकेट लीगमध्ये आर्याने ही कामगिरी केली होती, तर या स्पर्धेचे आयोजन हे गुजरात क्रिकेट असोसिएशनने केले होते.
advertisement
विशेष म्हणजे 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 च्या हंगामाआधी क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडण्याची इच्छा व्यक्त केली होती.पण त्याआधीच गुजराताच्या आर्या देसाईने क्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.
22 वर्षीय आर्या देसाईच्या उत्कृष्ट कामगिरीने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. हा विक्रम यापूर्वी ख्रिस गेलच्या नावावर होता, ज्याने आयपीएलमध्ये नाबाद 175 धावा केल्या होत्या. दरम्यान,टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ॲरॉन फिंचने 172 धावांची खेळी केली होती,असे जीसीएचे सचिव अनिल पटेल यांनी आयएएनएसला बोलताना सांगितले.
रणजी ट्रॉफी आणि दुलीप ट्रॉफीसारख्या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये गुजरातचे प्रतिनिधित्व केलेल्या आर्या देसाईने सुरत क्रिकेट टी-२० लीगमध्ये आपल्या फलंदाजीने सर्वांना खूप प्रभावित केले आहे. त्याने आपल्या या धडाकेबाज खेळीत 21 चौकार आणि 14 षटकार ठोकले. ही या लीगची सहावी आवृत्ती असून, यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व वयोगटांतील अव्वल संभाव्य खेळाडू सहभागी झाले आहेत.
आयपीएलमध्ये कोणत्या संघातून खेळतो
आर्या देसाई हा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा माजी खेळाडू असून तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या शिबिरांमध्ये नियमितपणे सहभागी होतो. राज्य स्तरावर, तो आपल्या सातत्यपूर्ण कामगिरी, दर्जा आणि आत्मविश्वासासाठी ओळखला जातो. जीसीएचे सचिव अनिल पटेल यांनी आर्या देसाईच्या आतापर्यंतच्या क्रिकेटपटू म्हणून केलेल्या प्रवासाविषयी सांगितले."आर्याने ज्याप्रकारे चेंडू मारला, तसे फटके मारणारा मी दुसरा कोणीही पाहिलेला नाही. ही खेळी सुरत जिल्हा क्रिकेट संघटना आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनने मान्यता दिलेल्या स्पर्धेत झाली. गुजरात क्रिकेट असोसिएशनच्या ११ जिल्ह्यांतील सर्व संभाव्य खेळाडू या स्पर्धेत सहभागी होत आहेत, असे अनिल पटेल यांनी आयएएनएसला फोनवर सांगितले,
रणजीत 500 हून अधिक धावा
आयपीएलमध्ये आर्या यापूर्वी आयपीएलमध्ये केकेआर संघाचा भाग होता आणि एक खूप आश्वासक खेळाडू आहे. त्याने मागील रणजी ट्रॉफी हंगामात 500 हून अधिक धावा केल्या. त्याने दोन्ही व्हाईट-बॉल स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली. मागच्या वेळी, त्याचा दुलीप ट्रॉफी संघात समावेश करण्यात आला होता आणि इमर्जिंग प्लेयर्स टूर्नामेंटसाठी भारताच्या अंडर-२३ संघातही त्याची निवड झाली होती.एकंदरीत, आम्ही त्याच्याकडून उज्ज्वल भविष्याची अपेक्षा करत आहोत,असे आर्या देसाईबद्दल बोलताना पटेल म्हणाले आहेत.
