टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत इंग्लंडचं मैदान गाजवणाऱ्या वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला आयसीसीने मोठे बक्षीस दिले आहे.सोमवारी इंग्लंड दौऱ्यातील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत चमकदार कामगिरी केल्याबद्दल त्याला ऑगस्ट महिन्यासाठी आयसीसीच्या 'सर्वोत्तम खेळाडू' पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
मोहम्मद सिराजने इंग्लंडमध्ये पाच सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने खेळले आणि 23 विकेट्स घेतल्या.जूनच्या अखेरीस सुरू झालेली ही मालिका ऑगस्टच्या सुरुवातीला संपली.सिराजने पाचही कसोटी सामन्यांमध्ये 185.3 षटके गोलंदाजी केली. या त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर भारत-इंग्लंड विरूद्ध मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली होती.
advertisement
आयसीसीने यावर सांगितले, मोहम्मद सिराजने ऑगस्टमध्ये फक्त एकच सामना खेळला होता पण त्या सामन्यातील त्याची शानदार गोलंदाजी त्याला नामांकन मिळवून देण्यासाठी पुरेशी होती. 'द ओव्हल' येथे इंग्लंडविरुद्ध अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात, या भारतीय वेगवान गोलंदाजाने 21.11 च्या सरासरीने नऊ विकेट्स घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आयसीसीने पुढे म्हटले, सिराजने पहिल्या डावात चार विकेट्स घेतल्या आणि नंतर दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात त्याच्या निर्णायक स्पेलमुळे भारताला विजय मिळाला आणि मालिका 2-2 अशी संपली. या शानदार प्रयत्नासाठी सिराजला या सामन्यासाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून घोषित करण्यात आले होते.
झिम्बाब्वेमधील कसोटी मालिकेतील विजयादरम्यान त्याच्या शानदार कामगिरीसाठी न्यूझीलंडच्या हेन्रीला नामांकन मिळाले आहे. उजव्या हाताच्या गोलंदाजाने या मालिकेत १६ विकेट्स घेतल्या. सील्सच्या शानदार कामगिरीमुळे, वेस्ट इंडिजने ३४ वर्षांनंतर त्यांच्या पहिल्या एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानचा पराभव केला. सील्सने तीन सामन्यांच्या मालिकेत १० विकेट्स घेतल्या.त्यामुळे या दोन खेळाडूंच तगडं आव्हान सिराजसमोर असणार आहे.आता यामध्ये कोण बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.