गौतम गंभीरचा हा निर्णय फक्त एका खेळाडूला बाहेर करण्याचा नाही तर टीमच्या बॉलिंग लाईनअपमध्ये नवीन संतुलन आणण्याचा प्रयत्न आहे. पण गंभीरचा हा निर्णय टीम इंडियाला फायदा करून देईल, का त्याचा उलटा परिणाम होईल? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. बुमराहची जागा घेणारा बॉलर त्याच्यासारखी कामगिरी करू शकेल का? याबाबतही साशंकता आहे.
advertisement
गंभीरच्या प्लानमधून बुमराह गायब?
बुमराहचं नाव टीम इंडियाच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये दिसलं नाही, तर साहजिकच क्रिकेट चाहते आणि तज्ज्ञ हैराण होऊ शकतात, कारण बुमराह टीम इंडियाच्या बॉलिंगचा महत्त्वाचा भाग आहे, पण आशिया कपसाठी गंभीरचा प्लान वेगळा असल्याचं सांगण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार युएईविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया स्पिन बॉलिंग आक्रमणासह खेळण्याची शक्यता आहे. दुबईमधली खेळपट्टी धीमी आणि स्पिन बॉलरना मदत करणारी असते, त्यामुळे गंभीर फास्ट बॉलरऐवजी तीन स्पिनर आणि एक ऑलराऊंडर घेऊन खेळण्याचा विचार करत आहे.
गंभीर एक फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर आणि तीन स्पिनर घेऊन खेळणार असेल, तर अर्शदीप हा टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. अर्शदीपसोबत हार्दिक सुरूवातीला बॉलिंग करू शकतो, त्यानंतर कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल हे तीन स्पिनर बॉलिंग करतील.
गौतम गंभीर याचे कोच राहिलेले संजय भारद्वाज यांनीही न्यूज 18 सोबत बोलताना गंभीर 8 बॅटर आणि 3 टेलएंडर्ससोबत मैदानात उतरू शकतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्येही याच फॉर्म्युलामुळे गंभीरला यश मिळाल्याचं संजय भारद्वाज म्हणाले आहेत.