Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये आज पाकिस्तान आणि युएई हे दोन संघ आमने सामने आले आहेत.या सामन्यात पाकिस्तानने युएईला 147 धावांचे लक्ष्य दिले आहे.या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात मोठी घटना घडली आहे. पाकिस्तानच्या एका खेळाडूने अंपायरचा थेट कानच फोडला आहे.त्यामुळे अंपायरने मैदान सोडलं आहे.तसेच काही काळासाठी खेळ थांबवण्यात आला होता.
advertisement
खरं तर पाकिस्तानच्या सहाव्या ओव्हर दरम्यान ही घटना घडली होती. त्याचं झालं असं की युएईच्या ध्रुव पराशरने मिड ऑनवर शॉर्ट खेळला होता.यावेळी त्यांनी एक धाव चोरी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याला धाव घेता आली नाही. यावेळी फिल्डींग करणाऱ्या खेळाडूने बॉल गोलंदाजाच्या दिशेने फेकला होता. मात्र बॉल जाऊन थेट अंपायर रुचिरा पल्लियागुरुगे कानावर लागला होता. पंचाची पाठ फिल्डरकडे होती ज्याने तो गोलंदाजाकडे फेकला आणि तो त्याच्या डाव्या कानावर लागला होता. यावेळी अंपायरला प्रचंड त्रास जाणवत होता. त्यामुळे अंपायर मैदान सोडले होते. त्यानंतर राखीव पंच, गाजी सोहेल मैदान आले होते.त्यामुळे काही काळासाठी खेळ थांबला होता.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात सॅम अयुब न धावता बाद झाल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसला. अयुबलाही भारताविरुद्ध खाते उघडता आले नाही. त्यानंतर तिसऱ्या षटकात पाकिस्तानने आणखी एक विकेट गमावली आणि फरहानला बाद केले. त्यानंतर फखर जमानने अर्धशतक झळकावत डाव स्थिर करण्याचा प्रयत्न केला. तथापि, पाकिस्तानचा धावगती मंदावली. तथापि, शेवटच्या षटकांमध्ये शाहीन शाह आफ्रिदीच्या स्फोटक फलंदाजीने 14 चेंडूत 29 धावा फटकावल्याने पाकिस्तानला २० षटकांत १४६ धावांपर्यंत मजल मारता आली.