शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वाल यांच्या अनुपस्थितीत सॅमसन अभिषेक शर्मासोबत ओपनिंगला आला होता, असं वक्तव्य आशिया कपसाठी भारतीय टीमची घोषणा केल्यानंतर, निवड समिती प्रमुख अजित आगरकर यांनी केलं होतं. गिलला आशिया कपसाठी टीम इंडियाचं उपकर्णधार बनवण्यात आले आहे, त्यामुळे अभिषेकसोबत गिल ओपनिंगला येईल हे निश्चित मानलं जात आहे. गिल आणि अभिषेक ओपनिंगला आले तर सॅमसनला खालच्या क्रमांकावर खेळावं लागेल किंवा त्याला टीममधून वगळलं जाण्याचीही शक्यता आहे.
advertisement
गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी टॉप ऑर्डरमध्ये सॅमसनचे स्थान कायम ठेवावे आणि शुभमन गिलला कुठेतरी फिट करावे, असा आग्रह शास्त्री करत आहेत. 'संजू टॉप-3 मध्ये सगळ्यात धोकादायक आहे. तिथेच तो तुम्हाला मॅच जिंकवून देतो. त्याला तिथेच ठेवले पाहिजे. सॅमसनला गिलसाठी बदलणं इतकं सोपं नाही. संजूचं टी-20 च्या टॉप ऑर्डरमधील रेकॉर्ड चांगलं आहे. गिल दुसऱ्या कुणाच्या जागी खेळू शकतो, पण सॅमसनला ओपनर म्हणून खेळवलं पाहिजे. संजूने ओपनर म्हणून बऱ्याच रन आणि शतकं केली आहेत', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.