TRENDING:

महिन्याभराच्या ब्रेकनंतर टीम इंडिया सज्ज! कोणत्या टीमना भिडणार? Asia Cup चे टाईम टेबल आत्ताच सेव्ह करा!

Last Updated:

आशिया कप 2025 ला मंगळवार 9 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये होणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आशिया कप 2025 ला मंगळवार 9 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये होणार आहे. तर टीम इंडिया त्यांचा पहिला सामना 10 सप्टेंबरला युएईविरुद्ध खेळणार आहे. 28 सप्टेंबरला आशिया कपची फायनल खेळवली जाणार आहे. स्पर्धेमध्ये होणाऱ्या एकूण 19 मॅच या दुबई आणि अबुधाबीमध्ये खेळवल्या जाणार आहेत. यंदाच्या आशिया कपमध्ये एकूण 8 टीम सहभागी झाल्या आहेत.
महिन्याभराच्या ब्रेकनंतर टीम इंडिया सज्ज! कोणत्या टीमना भिडणार? Asia Cup चे टाईम टेबल आत्ताच सेव्ह करा!
महिन्याभराच्या ब्रेकनंतर टीम इंडिया सज्ज! कोणत्या टीमना भिडणार? Asia Cup चे टाईम टेबल आत्ताच सेव्ह करा!
advertisement

आशिया कपमध्ये सहभागी झालेल्या 8 टीमना ग्रुप ए आणि ग्रुप बी अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान या चार टीम आहेत. त्यामुळे टीम इंडियाला ग्रुप स्टेजमध्ये पाकिस्तानशिवाय युएई आणि ओमानविरुद्ध खेळावं लागणार आहे. 3 पैकी 2 मॅच जिंकल्या तरी टीम इंडिया पुढच्या स्टेजसाठी क्वालिफाय होईल. तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग आहेत. ग्रुप ए आणि ग्रुप बी मधल्या टॉप-2 टीम सुपर-4 मध्ये जाणार आहेत, त्यामुळे सुपर-4 मध्येही भारत-पाकिस्तान सामना व्हायची शक्यता आहे. सुपर-4 मध्ये सर्वाधिक पॉईंट्स मिळवणाऱ्या टॉप-2 टीम 28 सप्टेंबरला आशिया कपच्या फायनलमध्ये खेळतील.

advertisement

ग्रुप ए मधल्या टीम

भारत, पाकिस्तान, युएई आणि ओमान

ग्रुप बी मधल्या टीम

श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग

किती वाजता सुरू होणार मॅच?

आशिया कपच्या सर्व मॅच या अबु धाबी आणि दुबईमध्ये होणार आहेत. भारतीय वेळेनुसार या मॅच रात्री 8 वाजता सुरू होतील.

कुठे पाहता येणार मॅच?

आशिया कपच्या मॅच या सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. याशिवाय सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग सोनी लिव्हवर केलं जाणार आहे.

advertisement

आशिया कपचं वेळापत्रक

9 सप्टेंबर- अफगाणिस्तान विरुद्ध हाँगकाँग

10 सप्टेंबर- भारत विरुद्ध युएई

11 सप्टेंबर- बांगलादेश विरुद्ध हाँगकाँग

12 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध ओमान

13 सप्टेंबर- बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका

14 सप्टेंबर- भारत विरुद्ध पाकिस्तान

15 सप्टेंबर- युएई विरुद्ध ओमान

15 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध हाँगकाँग

16 सप्टेंबर- बांग्लादेश विरुद्ध अफगाणिस्तान

17 सप्टेंबर- पाकिस्तान विरुद्ध युएई

advertisement

18 सप्टेंबर- श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान

19 सप्टेंबर- भारत विरुद्ध ओमान

सुपर-4 स्टेज

20 सप्टेंबर- B1 विरुद्ध B2

21 सप्टेंबर- A1 विरुद्ध A2

23 सप्टेंबर- A2 विरुद्ध B1

24 सप्टेंबर- A1 विरुद्ध B2

25 सप्टेंबर- A2 विरुद्ध B2

26 सप्टेंबर- A1 विरुद्ध B1

28 सप्टेंबर- फायनल

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
महिन्याभराच्या ब्रेकनंतर टीम इंडिया सज्ज! कोणत्या टीमना भिडणार? Asia Cup चे टाईम टेबल आत्ताच सेव्ह करा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल