TRENDING:

आशिया कप फायनलच्या टीम फिक्स! फक्त 2 मॅचमुळे मोठा उलटफेर, चक्रावून टाकणारं समीकरण

Last Updated:

आशिया कप 2025 च्या सुपर-4 स्टेजमध्ये आतापर्यंत 2 रोमांचक सामने खेळले गेले आहेत, यातला एक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
दुबई : आशिया कप 2025 च्या सुपर-4 स्टेजमध्ये आतापर्यंत 2 रोमांचक सामने खेळले गेले आहेत, यातला एक सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेटनी पराभव झाला, पण अजूनही त्यांचं आशिया कपच्या फायनलला पोहोचण्याचं आव्हान कायम आहे.
आशिया कप फायनलच्या टीम फिक्स! फक्त 2 मॅचमुळे मोठा उलटफेर, चक्रावून टाकणारं समीकरण
आशिया कप फायनलच्या टीम फिक्स! फक्त 2 मॅचमुळे मोठा उलटफेर, चक्रावून टाकणारं समीकरण
advertisement

सुपर-4 मध्ये झाला मोठा उलटफेर

दुसरीकडे भारताने पाकिस्तानला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेने पुढचं पाऊल टाकलं आहे. तर पाकिस्तानसाठी मात्र फायनलचा रस्ता कठीण झाला आहे. फायनलला पोहोचण्यासाठी पाकिस्तानला त्यांचे उरलेले दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. पाकिस्तानचा पुढचा सामना मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. श्रीलंकेने ग्रुप स्टेजमधले त्यांचे सगळे सामने जिंकले, पण सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेचा पराभव केला.

advertisement

पाकिस्तानसाठी करो या मरो

पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला तर मात्र त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. पाकिस्तानने श्रीलंकेला हरवलं, तर त्यांचा पुढचा सामना गुरूवारी बांगलादेशविरुद्ध होईल. या सामन्यातही पाकिस्तानने विजय मिळवला, तर पाकिस्तान आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचेल. आशिया कपची फायनल रविवारी होणार आहे.

advertisement

बांगलादेश-श्रीलंकाही रेसमध्ये

दुसरीकडे बांगलादेश आणि श्रीलंकाही आशिया कप फायनलच्या रेसमध्ये आहेत. बांगलादेशने सुपर-4 चा पहिला सामना जिंकला आहे, तर श्रीलंकेची टीमही चांगल्या फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे या दोन टीमही फायनल गाठू शकतात.

टीम इंडिया अजूनही सेफ नाही

भारताने सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला, पण अजूनही त्यांचं फायनलचं स्थान निश्चित झालं नाही. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला उरलेल्या दोनपैकी किमान एक सामना जिंकावा लागणार आहे. भारताचा पुढचा सामना बुधवारी बांगलादेशविरुद्ध आहे, त्यानंतर शुक्रवारी श्रीलंकेविरुद्ध लढत होईल. या दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला, तर त्यांचं फायनलला पोहोचण्याचं स्वप्न भंगेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कप फायनलच्या टीम फिक्स! फक्त 2 मॅचमुळे मोठा उलटफेर, चक्रावून टाकणारं समीकरण
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल