कुलदीपशिवाय टीम इंडियाच्या इतर बॉलरनीही पाकिस्तानच्या बॅटिंगला डोकं वर काढू दिलं नाही. अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराहला 2-2 विकेट मिळाल्या, पण जसप्रीत बुमराहने हारिस राऊफची विकेट घेतल्यानंतर केलेलं सेलिब्रेशन चर्चेचा विषय ठरत आहे.
advertisement
जसप्रीत बुमराहने टाकलेल्या यॉर्करवर हारिस राऊफ बोल्ड झाला, यानंतर बुमराहने विमान पडल्याचं सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमधून बुमराहने हारिस राऊफला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं. सुपर-4 च्या सामन्यामध्ये बाऊंड्री लाईनवर फिल्डिंग करत असताना हारिस राऊफने भारतीय चाहत्यांना पाहून विमान पडल्याची ऍक्शन केली होती, तसंच 6-0 चे इशारे केले होते. तसंच राऊफने संजू सॅमसनची विकेट घेतल्यानंतरही विमान पाडल्याची ऍक्शन केली होती.
हारिस राऊफच्या या वर्तनानंतर बीसीसीआयने त्याच्याविरोधात आयसीसीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आयसीसीने हारिस राऊफची सुनावणी घेतली. या सुनावणीनंतर हारिस राऊफ दोषी आढळला, त्यामुळे त्याच्या मॅच फीचे 30 टक्के पैसे कापण्यात आले आणि त्याला एक डिमेरिट पॉईंट देण्यात आला.