TRENDING:

ऑस्ट्रेलियाचा 'युवराज', 40 टक्के किडनी निकामी असतानाही जिंकवून दिला वर्ल्ड कप, महिन्याभरानंतर सांगितलं

Last Updated:

ऑस्ट्रेलियाने मागच्याच महिन्यात भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग असलेल्या खेळाडूने त्याच्या आजरपणाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पर्थ, 14 डिसेंबर : ऑस्ट्रेलियाने मागच्याच महिन्यात भारतात झालेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्ड कप विजेत्या टीमचा भाग असलेल्या खेळाडूने त्याच्या आजरपणाबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. मृत्यूशी लढाई सुरू असताना मी ऑस्ट्रेलियाकडून खेळेन असं वाटलंही नव्हतं. डॉक्टरांनी हा फक्त 12 वर्ष जगेल, असं सांगितलं होतं, पण कुटुंबाने मदत केली आणि इच्छाशक्तीच्या जोरावर मी इथपर्यंत पोहोचलो, असं त्याने सांगितलं. ऑस्ट्रेलियाच्या या खेळाडूचं नाव आहे कॅमरून ग्रीन. ऑलराऊंडर असलेला कॅमरून ग्रीन मागच्या मोसमात मुंबईकडून आयपीएल खेळला, तर यंदा तो आरसीबीच्या टीममध्ये आहे.
माझी किडनी 40 टक्के निकामी, वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितलं
माझी किडनी 40 टक्के निकामी, वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूने सांगितलं
advertisement

माझा जन्म झाला तेव्हा मी इररिव्हर्सिबल क्रॉनिक किडनी या आजाराने ग्रस्त होतो. मी 12 वर्षांपेक्षा जास्त जगू शकेन का नाही, याबाबतही डॉक्टरांच्या मनात शंका होती. या आजाराची कोणतीही लक्षणं नसतात आणि यामध्ये किडनी कधीच ठीक होऊ शकत नाही, असं ग्रीनने चॅनल 7 ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं.

माझा जन्म झाला तेव्हा मला इररिव्हर्सिबल क्रॉनिक किडनीचा आजार असल्याचं डॉक्टरांनी माझ्या आई-वडिलांना सांगितलं. या आजाराची कोणतीही लक्षणं नसतात, तसंच अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून या आजाराबाबत कळतं. क्रॉनिक किडनीचा आजार वाढत जातो. दुर्दैवाने, माझी मूत्रपिंड इतर लोकांच्या मूत्रपिंडांप्रमाणे रक्त स्वच्छ करत नाही, असं वक्तव्य ग्रीनने केलं.

advertisement

advertisement

ऑलराऊंडर असलेला कॅमरून ग्रीन ऑस्ट्रेलियन टीमचा महत्त्वाचा सदस्य आहे. माझी किडनी सध्या 60 टक्के सुरू आहे, जे दुसऱ्या टप्प्यात आहे. पाचव्या टप्प्यात प्रत्यारोपण किंवा डायलिसिसची गरज पडते, अशी प्रतिक्रिया ग्रीनने दिली.

'मी आजाराच्या दुसऱ्या टप्प्यात आहे, पण चांगली देखभाल केली नाही तर हा स्तर आणखी खाली जाईल. किडनी नीट होऊ शकत नाही, त्यामुळे आजार वाढण्याची गती कमी करण्याची पद्धत वापरावी लागते, तुम्ही फक्त प्रयत्न करू शकता,' असं ग्रीनने सांगितलं.

advertisement

ग्रीनची आई टार्सी यांना प्रेग्नंट असताना 19व्या आठवड्यात स्कॅनिंगवेळी या आजाराबाबत डॉक्टरांनी कल्पना दिली होती, त्यावेळी आम्हाला याबाबत फार माहिती नव्हती. तो 12 वर्षांपेक्षा जास्त जगेल याची अपेक्षाही नव्हती, असं ग्रीनचे वडील म्हणाले.

फास्ट बॉलिंग ऑलराऊंडर असलेल्या ग्रीनने 2020 साली ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून ग्रीनने 24 टेस्ट, 23 वनडे आणि 8 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. या आजारामुळे माझ्या क्रिकेट करिअरवरही परिणाम झाला, कारण माझ्या मांसपेशी लवकर खेचल्या जातात. मला मीठ आणि प्रोटीन कमी खावं लागतं, क्रिकेटर म्हणून हे योग्य नाही, पण मी मॅच असताना जास्त प्रोटिन घेतो, कारण मैदानात खूप उर्जा खर्च करावी लागते, स्वत:ची योग्य देखभाल करण्यासाठी योग्य पद्धत शोधावी लागते, असं ग्रीनने सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ऑस्ट्रेलियाचा 'युवराज', 40 टक्के किडनी निकामी असतानाही जिंकवून दिला वर्ल्ड कप, महिन्याभरानंतर सांगितलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल