खरं तर ढाकाच्या शेरे बांग्ला स्टेडिअमवर पार पडलेल्या पहिल्या वनडे सामन्यात बांग्लादेश संघाने पाकिस्तानचा डाव 114 धावांवर ऑलआऊट केला होता.त्यामुळे बांग्लादेशसमोर 115 धावांचे लक्ष्य होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांग्लादेशची सूरूवात खराब झाली होती. कारण सैफ हसन 4 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर हंजिद हसन तमिम आणि नजमुल शांतोने बांग्लादेशचा डाव सावरला होता. पण पुढे जाऊन शांतो 27 वर बाद झाला होता. त्यानंतर तांजिद तमीमने शेवटपर्यंत क्रिजवर उभं राहत 42 बॉलमध्ये 67 धावांची खेळी केली होती.त्याच्या या खेळीच्या बळावर बांग्लादेशने वनडे मॅच 15.1 ओव्हर म्हणजेच 91 बॉलमध्ये जिंकली होती.त्यामुळे बांगलादेशने हा सामना 8 विकेटने जिंकून पाकिस्तानचा करेंक्ट कार्यक्रम केला होता.
advertisement
पाकिस्तानच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर सूरूवात खराब झाली होती. पाकिस्तानचा साहिबजादा फरहान 27 धावांवर बाद झाला होता.त्यानंतर माज सदाकत 18 वर बाद झाला. त्यानंतक शामिल हुसेन 4, मोहम्मद रिझवान 10, सलमान आघा 5, हसन तुलत 4, अब्दुल समद 0,शाहिन आफ्रिदी 4, मोहम्मद वसीम 0 धावांवर बाद झाला होता. पाकिस्तानकडून फहीम अश्रमने सर्वाधिक 37 धावांची खेळी केली होती. या बळावर पाकिस्तानचा डाव 30.4 ओव्हरमध्ये 114 धावांवर ऑल आऊट झाला होता.
बांग्लादेशकडून नाहीद राणाने सर्वाधिक 5, मेहदी हसनने 3,तास्किन अहमद आणि मुस्तफिजूर रहमानने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली होती.
