संपूर्ण संघ सुरक्षित कसा असेल?
बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला तातडीने संघातून मुक्त करण्याचे आदेश दिल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. बांगलादेश सरकारचे क्रीडा सल्लागार असिफ नझरुल यांनी या प्रकरणी कडक भूमिका घेतली असून, त्यांनी म्हटलं आहे की जर भारतात एका बांगलादेशी खेळाडूची सुरक्षा सुनिश्चित होऊ शकत नसेल, तर संपूर्ण संघ तिथं सुरक्षित कसा असेल?
advertisement
आयपीएलचे प्रक्षेपण देखील पूर्णपणे बंद
मुस्तफिजुरला 9.20 कोटी रुपयांना केकेआरने लिलावात विकत घेतलं होतं. मात्र भारतातील काही राजकीय आणि धार्मिक संघटनांच्या विरोधानंतर बीसीसीआयने हा कठोर निर्णय घेतला. या अपमानाचा निषेध म्हणून बांगलादेश सरकारने देशातील आयपीएलचे प्रक्षेपण देखील पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सामने भारताऐवजी संयुक्त यजमान असलेल्या श्रीलंकेत खेळवण्याची विनंती आयसीसीकडे केली आहे.
रिप्लेसमेंट घेण्याची परवानगी
दरम्यान, ऑगस्ट-सप्टेंबर 2026 मध्ये होणारी भारत-बांगलादेश द्विपक्षीय मालिका देखील आता संकटात सापडली असून, भारतीय संघ बांगलादेशचा दौरा करण्याची शक्यता धूसर आहे. तर बीसीसीआयच्या आदेशानुसार केकेआरने मुस्तफिजुर रहमानला संघातून बाहेर केले असून त्याला रिप्लेसमेंट घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
