आरोप नाकारले तर...
बीसीसीआयने बुधवारी या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आणि आयसीसीला ई-मेल मिळाला आहे. जर साहिबजादा आणि रौफ यांनी लेखी स्वरूपात आरोप नाकारले तर त्यांना आयसीसी एलिट पॅनेल रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर राहावे लागू शकतं. अशातच आता दुसरीकडे पाकिस्ताने देखील बीसीसीआयच्या कारवाईला उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केलाय.
advertisement
सूर्यकुमार यादवविरुद्ध तक्रार
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. 14 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यातील विजय ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या भारतीय सशस्त्र दलांना समर्पित केल्याबद्दल आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख केल्याबद्दल सूर्यकुमार यादव याच्यावर पाकिस्तानने आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे.
आयसीसीच्या नियमानुसार सात दिवसाच्या आत...
सूर्यकुमार यादवने केलेलं वक्तव्य राजकीय असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटलं आहे. पण आयसीसीच्या नियमानुसार सात दिवसाच्या आत तक्रार नोंदवावी लागते. बीसीसीआयने नियमानुसार तक्रार नोंदवली आहे. परंतू पीसीबीची तक्रार दाखल करून घेतली जाणार नाही, अशी शक्यता आहे.
अभिषेक शर्माला शिवीगाळ
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान हॅरिस रौफने भारतीय सैन्याच्या लष्करी कृतीची खिल्ली उडवण्यासाठी विमान पाडल्याचा इशारा केला. त्याच्या गोलंदाजीदरम्यान, हॅरिस रौफने भारतीय सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा यांनाही शिवीगाळ केली. साहिबजादा फरहानने त्याच्या बॅटचा मशीनगन म्हणून वापर करून आणि बंदुकीचा इशारा करून आनंद साजरा केला. तर हॅरिस रौफने एअर क्राफ्ट पडल्याचा इशारा करत भारताचा डिवचलं होतं.