TRENDING:

उस्मान तारिकची ऍक्शन कॉपी केली, पण मस्ती महागात पडली... भर स्टेडियममध्ये इज्जत गेली, Video

Last Updated:

टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा स्पिनर उस्मान तारिक याच्या बॉलिंग ऍक्शनची सर्वाधिक चर्चा झाली. बॉल टाकण्याच्या आधी उस्मान तारिक मध्येच थांबतो आणि त्यानंतर बॉल टाकतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचा स्पिनर उस्मान तारिक याच्या बॉलिंग ऍक्शनची सर्वाधिक चर्चा झाली. बॉल टाकण्याच्या आधी उस्मान तारिक मध्येच थांबतो आणि त्यानंतर बॉल टाकतो. बॉलिंग करताना मध्येच थांबणं आणि स्लिंगी ऍक्शनमुळे अनेक बॅटरना उस्मान तारिकविरुद्ध खेळताना अडचणींचा सामना करावा लागला.
उस्मान तारिकची ऍक्शन कॉपी केली, पण मस्ती महागात पडली... भर स्टेडियममध्ये इज्जत गेली, Video
उस्मान तारिकची ऍक्शन कॉपी केली, पण मस्ती महागात पडली... भर स्टेडियममध्ये इज्जत गेली, Video
advertisement

उस्मान तारिकची ऍक्शन कॉपी

एखाद्या बॉलरची ऍक्शन चर्चेमध्ये आली की तरुण खेळाडू तीच ऍक्शन कॉपी करायला जातात. श्रीलंकेच्या स्थानिक स्पर्धेमध्येही एका स्पिनरने उस्मान तारिकसारखीच बॉलिंग टाकण्याचा प्रयत्न केला, पण अंपायरने यावर आक्षेप घेतला आणि थेट डेड बॉल देऊन टाकला.

श्रीलंकेतील रिचमंड आणि महिंदा या दोन कॉलेजमध्ये झालेल्या सामन्यात हा प्रकार घडला आहे. रिचमंड कॉलेजचा डावखुरा स्पिनर नेथुजा बसिथा याने उस्मान तारिकची ऍक्शन कॉपी केली, पण यात त्याने आणखी एक ट्विस्ट जोडला. बॉल टाकण्याआधी नेथुजा थांबला आणि क्रीजजवळच उड्या मारायला लागला आणि त्यानंतर त्याने बॉल टाकला. पण अंपायरने लगेचच डेड बॉलचा इशारा केला.

advertisement

बॅटरचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न?

क्रिकेटच्या नियमानुसार बॉलर बॉलिंग करताना बॅटरचं लक्ष विचलित करू शकत नाही. जर बॉलरने असं केलं तर अंपायर डेड बॉल देतो. थांबून बॉल टाकणं ही नेथुजा याची नेहमीची बॉलिंग ऍक्शन नाही, त्यामुळे तो बॅटरचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता हे स्पष्टपणे दिसत होतं, त्यामुळे अंपायरने डेड बॉल दिला. दुसरीकडे उस्मान तारिकची बॉलिंग ऍक्शन थांबून बॉल टाकण्याचीच आहे, त्यामुळे तारिकच्या बॉलिंगवर आक्षेप घेतला जात नाही.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

उस्मान तारिक टी-20 वर्ल्ड कपमधला पाकिस्तानचा सगळ्यात यशस्वी बॉलर होता, त्याने 6 मॅचच्या 5 इनिंगमध्ये 7.23 च्या इकोनॉमी रेटने 10 विकेट घेतल्या. 16 रन देऊन 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. 28 वर्षांच्या उस्मान तारिकने आतापर्यंत 50 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर 80 विकेट आहेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
उस्मान तारिकची ऍक्शन कॉपी केली, पण मस्ती महागात पडली... भर स्टेडियममध्ये इज्जत गेली, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल