संजूच्या वाढदिवसानिमित्त सीएसकेचं ट्विट
एकीकडे ट्रेड डीलची चर्चा होत असताना चेन्नई सुपर किंग्जने संजू सॅमसनसाठी पोस्ट केली आहे. संजू सॅमसनचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सीएसकेने ट्विट केलं. संजू, तुला आणखी शक्ती मिळो! तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, असं सीएसकेने ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विट करताना संजू सॅमसनने Super birthday अशी टर्म वापरली आहे. त्यामुळे आता अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement
डेवाल्ड ब्रेव्हिसची मागणी
जडेजा आणि सॅमसन हे दोन्ही खेळाडू 18 कोटी रुपयांचे खेळाडू आहेत आणि हा करार आतापर्यंत पूर्ण व्हायला हवा होता. परंतु, राजस्थान रॉयल्सला हा केवळ सरळ अदलाबदल मान्य नसल्याचं समजतंय. राजस्थान रॉयल्स कराराचा एक भाग म्हणून जडेजासह दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू डेवाल्ड ब्रेव्हिसची मागणी केल्याची माहिती मिळाली आहे. राजस्थानचे मालक मनोज बदळे मुंबईत असून त्यांच्या वाटाघाटी सुरू आहेत.
चेन्नई सुपर किंग्जकडे जाणार?
दरम्यान, संजूचा जन्म 11 नोव्हेंबर 1994 रोजी केरळमधील (Kerala) तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलुविल गावात झाला होता. संजू सॅमसन हा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो केरळ संघाचे प्रतिनिधित्व करतो. आता आयपीएल ऑक्शनआधी संजू सॅमसन चेन्नई सुपर किंग्जकडे जाणार का? असा सवाल विचारला जात आहे.
