खरं तर आज सकाळपासून महाराष्ट्र केसरी क्रेझ पाहायला मिळत होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विजेत्याला चांदीची गदा दिली जाईल, असे बोलले जात होते. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा डाव टाकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या लढतीला उपस्थित राहणार नाही,अशी माहिती मिळते आहे. कारण महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाला वादाची किनार लाभली आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आणि कुस्तीगीर संघ यांच्या मध्ये वाद सूरू आहेत. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्र केसरीच्या फायनलला उपस्थित राहणे टाळल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. दरम्यान मुख्यमंत्री जरी या स्पर्धेला उपस्थित नसले तरी त्यांनी व्हिडिओ संदेश दिला होता.
advertisement
मानाची कोणाच्या हस्ते देणार?
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पर्धेकडे पाठ फिरवल्यामुळे आयोजकांना मोठा धक्का बसला आहे.पण जरी मुख्यमंत्री या स्पर्धेला आले नसले तरी कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांनी या स्पर्धेला हजेरी लावली आहे. त्यामुळे महाराष्ट्र केसरी विजेत्याला पुरस्कार कृषी मंत्री दत्ता मामा भरणे आणि मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. त्यामुळे आयोजकांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
विजेत्यांना काय काय मिळणार?
दरम्यान यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे. विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. यात कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे. यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.
