पाळीव प्राण्यासोबतच्या काही आठवणी
श्रेयस अय्यर याने इन्टाग्रामवर एक पोस्ट केली. यामध्ये त्याने व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओच्या माध्यामातून त्याने सर्वांना दु:खद बातमी दिली. व्हिडिओमध्ये अय्यर आणि त्याचा पाळीव कुत्रा दिसतोय, खरं तर अय्यरने त्याच्या पाळीव प्राण्यासोबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत कारण तो आता या जगात नाही. रेस्ट इझी माय एंजल, असं म्हणत श्रेयसने आपल्या लाडक्या कुत्र्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
advertisement
वेस्ट इंडिजविरुद्ध संधी मिळणार का?
दरम्यान, याव्यतिरिक्त, त्याने नुकतेच पंजाब किंग्सचे आयपीएलमध्ये नेतृत्व केले होते, ज्यात संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. एशिया कपच्या संघात त्याचा समावेश न झाल्याने काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती, पण आता तो 'इंडिया ए' संघात चांगली कामगिरी करून राष्ट्रीय संघात परत येण्याचा प्रयत्न करत आहे. आगामी वेस्ट इंडिज स्कॉडमध्ये तरी श्रेयसला संधी मिळणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.