चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये आतापर्यंत पाच वेळा ट्रॉफी जिंकली आहे.यंदा त्यांना सहाव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे. ही संधी बळकावण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज मैदानात कसून सराव करत होती.पण आयपीएल आधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे.कारण ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज नॅथन एलिस हा स्पर्धेबाहेर झाला आहे.फ्रँचायझीने अद्याप त्याच्या बदली खेळाडूची घोषणा केलेली नाही, परंतु ही फ्रँचायझीसाठी एक मोठी चिंतेची बाब आहे.
advertisement
लिलावापूर्वी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील संघाने श्रीलंकन वेगवान गोलंदाज मथिशा पाथिरानाला मुक्त करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.त्यामुळे या हंगामात वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी नथन एलिसवर होती. पण आता त्याला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला आहे.
एलिसला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली असून तो 2026 च्या हंगामात खेळण्यासाठी वेळेवर तंदुरुस्त होणार नाही. "हा आमच्यासाठी एक मोठा धक्का आहे. एलिस एक महत्त्वाचा गोलंदाज आहे, विशेषतः अखेरच्या षटकांमध्ये. आम्ही त्याच्या जागी नवीन खेळाडू शोधत आहोत," असे सीएसकेचे सीईओ के. एस. विश्वनाथन यांनी स्पोर्टस्टारशी बोलताना सांगितले आहे.
आयपीएल कारकिर्द
एलिसला सीएसकेने 2025च्या आयपीएल मेगा लिलावात 2 कोटी रुपयांना करारबद्ध केले होते.तो पाथिरानाचा बदली खेळाडू होता आणि त्याने फक्त एकच सामना खेळला, ज्यात त्याने एक बळी घेतला. हा सामना 'मेन इन यलो'चा मुंबई इंडियन्स विरुद्ध त्यांच्या दुर्दैवी हंगामातील पहिला सामना होता. एलिस 2021 ते 2025 पर्यंत पंजाब किंग्स संघाचा भाग होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 17 सामने खेळले असून 19 विकेट घेतले आहेत.
दरम्यान सीएसके लवकरच बदली खेळाडूची घोषणा करण्याची शक्यता आहे, परंतु तो खेळाडू कोण असेल याचे अद्याप कोणतेही संकेत नाहीत. त्यांच्या सध्याच्या संघात न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज मॅट हेन्री आणि झॅक फॉल्क्स आणि इंग्लंडचा वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू जेमी ओव्हरटन हे परदेशी वेगवान गोलंदाज आहेत.तसेच भारतीय खेळाडूंमध्ये चांगले वेगवान गोलंदाजीचे पर्यायही आहेत, ज्यात खलील अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी आणि गुरजपनीत सिंग यांचा या हंगामासाठी समावेश आहे. आता रिप्लेसर म्हणून चेन्नई सुपर किंग्ज कुणाला संघात घेते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
