160 रन्सपर्यंत मजल मारता आली असती - ऋतुराज
सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी टाकलेल्या भेदक स्पेलमुळे बॅटिंग करणं आमच्या बॅटर्ससाठी कठीण झालं होतं. पीचवर बॉलला मिळणारी मूव्हमेंट आणि स्पिनर्सना मिळणारी मदत यामुळे बॅटर्सला मोकळेपणाने खेळता आलं नाही, असं ऋतुराज गायकवाडने म्हटलं आहे. बॅटिंगमध्ये आम्हाला चांगली कामगिरी करता आली असती. टीमला किमान 150 ते 160 रन्सपर्यंत मजल मारता आली असती, असं म्हणत ऋतुराजने चेन्नईच्या बॅटर्सवर पराभवाचं खापर फोडलं आहे.
advertisement
RR vs CSK : 18 कोटींचा जड्डू ठरला गेमचेंजर, शिवम दुबेची विकेट कशी काढली? सर जडेजाने सांगितली ट्रिक
मी अजिबात हताश झालेलो नाही - ऋतुराज गायकवाड
बॅटर्सनी थोडा अधिक संयम दाखवून मॅच डीपमध्ये घेऊन जाणं आवश्यक होतं, मात्र विकेटची स्थिती पाहता हे आव्हान कठीण होतं. पण असो.. आजचा दिवस आमच्यासाठी नव्हता, पण या पराभवामुळे मी अजिबात हताश झालेलो नाही, असंही ऋतुराज गायकवाडने म्हटलं आहे. पण पहिल्याच मॅचमध्ये झालेल्या चुकांमधून शिकण्याची ही मोठी संधी आहे. इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे आता कोणतीही धावसंख्या सुरक्षित राहिलेली नाही, असं मत देखील त्याने यावेळी व्यक्त केलंय.
खेळाडूंची मानसिकचा सुधारण्याची गरज - ऋतुराज गायकवाड
येत्या 3 दिवसांत टीमची पुढची मॅच असून त्यापूर्वी सर्व खेळाडूंची मानसिकचा सुधारण्याची गरज आहे, असंही ऋतुराजने यावेळी म्हटलंय. कदाचित आम्हाला या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. पण आमची बॅटिंग लाईन अप तगडी आहे. आम्ही कधीही मॅच चेंज करू शकतो, त्यासाठी योग्य रणनितीने मैदानात उतरावं लागेल, असंही ऋतुराज मनातलं बोलून गेला. सुधारणेला वाव आहे आणि आम्ही त्यावर काम करू, असंही तो यावेळी म्हणाला.
