13 बॉल काही असताना डेव्हिड कॉन्वे रिटायर्ड आऊट
सामना अंतिम टप्प्यात आल्यावर सीएसकेने एक निर्णय घेतला. 18 व्या ओव्हरमध्ये धोनी आणि डेव्हिड कॉन्वे मैदानात खेळत होते. त्यावेळी धोनीने डेव्हिड कॉन्वेला रिटायर्ड आऊट होण्यास सांगितलं. मॅचला 13 बॉल काही असताना डेव्हिड कॉन्वे रिटायर्ड आऊट झाला आणि त्याच्या जागी रविंद्र जडेजा आला. जडेजा आणि धोनी यांची जोडी पुन्हा फिनिशिंगला आली अन् दोघांना पुन्हा सामना जिंकवून देता आला नाही. सीएसकेचा सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने रिटायर्ड आऊट होण्यापूर्वी 49 चेंडूत 69 धावा केल्या होत्या.
advertisement
वीरेंद्र सेहवागची टीका
हार्दिक पांड्याने तिलक वर्माला रिटायर्ड आऊट करून जी चूक केली, तीच सीएसकेने देखील डेव्हिड कॉन्वेच्या बाबतीत केली, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. डेव्हिड कॉन्वेला रिटायर्ड आऊट करायचं होतं तर खूप आधी करायला पाहिजे होतं. सामना कधीही चेंज होईल, अशा परिस्थितीत डेव्हिड कॉन्वेला बाहेर पाठवणं चुकीचं आहे, असं वीरेंद्र सेहवागने म्हटलं होतं. डेव्हिड कॉन्वे चांगली फलंदाजी करत असताना थालाने घेतलेला निर्णय योग्य होता का? असा सवाल विचारला जात आहे.
ऋतुराज गायकवाड म्हणतो...
दरम्यान, डेव्हिड कॉन्वे हा टॉप ऑर्डरचा टायमिंगने खेळणारा फलंदाज आहे. तो टॉप ऑर्डरमध्ये महत्त्वाची भूमिका निभावतो. पण रविंद्र जडेजाचा रोल खूप वेगळा आहे. तुम्हाला माहिती असतं की बॅट्समन स्ट्रगल करत आहे. आम्ही त्याला वेळ दिला पण अखेर परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागला, असं ऋतुराज गायकवाड याने म्हटलं आहे. त्यामुळे ऋतुराज धोनीच्या चुकांवर पांघरुन टाकतोय का? असा सवाल विचारला जात आहे.