काय म्हणाला चहल?
'मी ऐकलं की तू पार्टी ऍनिमल होतास?', असा प्रश्न चहलला विचारला गेला. 'ते पण काय दिवस होते. आता मी पार्ट्यांमध्ये जाऊन फक्त चहा पितो. मसाला चहा आणि कोल्ड्रिंक्स. मी दारू पूर्णपणे सोडली आहे, आता एक थेंबही घेत नाही', असं उत्तर चहलने दिलं. यावर मुलाखत घेणाऱ्याने चहलला दारू सोडून किती दिवस झाले? असा प्रश्न विचारला, त्यावर चार महिने असं चहलने सांगितलं.
advertisement
दारू का सोडली? असं विचारलं असता, एक वेळ येते जेव्हा तुम्हाला जाणवतं की आता पुरे झालं. मला आता बरं वाटत आहे. एका बाजूला आयुष्याची 35 वर्ष आहेत आणि दुसरीकडे हे 4 महिने. हे 4 महिने मला खऱ्या आयुष्यासारखे वाटतात, असं चहल म्हणाला. मी आधी खूप बिअर प्यायचो, पण आता हे सोडून दिलं आहे. आयुष्य खूप चांगलं आहे. माझ्यातील हा एकमेव दोष होता, जो मी सोडून दिला आहे. मी दिवाळी आणि ख्रिसमसच्या पार्टीला गेलो, तिथे लोक माझ्यासमोरच दारू पित होते, पण मी एका थेंबालाही स्पर्श केला नाही, हा मानसिकतेचा प्रश्न आहे, अशी प्रतिक्रिया चहलने दिली.
आरजे महावश चांगली मैत्रिण
दरम्यान आरजे महावशसोबतच्या डेटिंगच्या बातम्या या फक्त अफवा आहेत. आम्ही दोघं फक्त चांगले मित्र आहोत, आमच्यात दुसरं काहीही नाही, असंही चहलने स्पष्ट केलं आहे. भारतीय टीममधून बाहेर असलेला युझवेंद्र चहल हा देशांतर्गत क्रिकेट आणि इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळला. आता मार्च महिन्यात चहल आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळताना पुन्हा दिसेल.
