लीड रोल धोनीसाठीच...
कार्तिकने सांगितलं, "त्या काळात राहुल द्रविड विकेटकीपिंग करत होता, पण नंतर त्याने फक्त फलंदाजीवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. तेव्हा टीमला एका नियमित विकेटकीपरची गरज होती. मला काही काळ संधी मिळाली, पण लीड रोल धोनीसाठीच ठरलेला होता. तो आल्यावर सर्व काही बदललं."
नवीन भूमिका स्वीकाराव्या लागल्या
advertisement
धोनीच्या यशानंतर कार्तिकला टीममध्ये टिकून राहण्यासाठी अनेकदा नवीन भूमिका स्वीकाराव्या लागल्या. "मी सरड्यासारखा झालो," कार्तिक म्हणाला. "जर टीममध्ये ओपनरची जागा असेल, तर मी तामिळनाडूसाठी ओपनिंग करत असे. जर मिडल ऑर्डरमध्ये गरज असेल तर तिथं फलंदाजी करत असे. खरी कसोटी टीममध्ये स्थान मिळवण्यापेक्षा ते टिकवून ठेवण्याची होती. अनेकदा दबावामुळे मी माझं सर्वोत्तम प्रदर्शन करू शकलो नाही."
सोपं नव्हतं, पण मी ते स्वीकारलं
धोनीने मला थेट काही शिकवलं नाही, पण त्याच्या कृतीतून मला खूप काही कळलं. लवचिकता, धैर्य आणि संयम सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात मी नंबर 6 आणि 7 वर बॅटिंग केली, जे सोपं नव्हतं, पण मी ते स्वीकारलं, असंही कार्तिकने पुढं म्हटला.
निदाहास ट्रॉफीची फायनल
दरम्यान, दिनेश कार्तिक शेवटचा भारतीय टीमसाठी 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये खेळला. आयपीएल 2022 मधील त्याच्या उत्कृष्ट प्रदर्शनामुळे त्याने टीममध्ये परत प्रवेश केला. तो 2007 चा टी-20 वर्ल्ड कप आणि 2013 च्या चैंपियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या टीमचा भाग होता. कार्तिकने एकूण 26 कसोटी, 94 वनडे आणि 60 टी-20 मॅच खेळल्या आहेत. 2018 च्या निदाहास ट्रॉफीच्या फायनलमधील शेवटच्या बॉलवर मारलेला सिक्स त्याच्या कारकिर्दीतील सर्वात अविस्मरणीय क्षण मानला जातो, ज्यामुळे भारताने तो सामना जिंकला होता.