खेळपट्टीवरून मतभेद
साऊथ अफ्रिकेविरुद्ध भारतीय टीमला विजयासाठी फक्त 124 धावांचे माफक आव्हान होतं, पण हे लक्ष्यही टीम इंडियाला गाठता आलं नाही. यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या महत्त्वाच्या कसोटी मॅचमध्ये भारताला 30 धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर टीम इंडियाचा कॅप्टन शुभमन गिल आणि प्रशिक्षक गौतम गंभी यांच्यात खेळपट्टीच्या निवडीवरून मतभेद असल्याची चर्चा दबक्या आवाजात आहे.
advertisement
शुभमन गिल काय म्हणाला होता?
या मतभेदांच्या चर्चेला कारण ठरलं. शुभमन गिलचे गेल्या महिन्यात अहमदाबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पूर्वसंध्येचे एक वक्तव्य... त्यावेळी शुभमन गिलने स्पष्टपणे सांगितलं होतं की, 'फिरकी गोलंदाजीला जास्त मदत करणाऱ्या खेळपट्ट्यांना प्राधान्य देण्याची सिस्टीम टीमने सोडून दिली पाहिजे.' असं असतानाही, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची पहिली मॅच फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर खेळवण्यात आली.
पीच क्युरेटरसोबत बैठक
दरम्यान, टीम इंडियामध्ये कॅप्टनचं काहीही ऐकलं जात नाही. फक्त गंभीरची दादागिरी सुरू आहे, असं चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. कोलकाता कसोटीआधी पीच क्युरेटर सुजन मुखर्जी यांच्यासोबत वारंवार बैठका झाल्याची माहिती समोर आली आहे. तब्बल चार दिवस पीचला पाणी देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे बॉल कधी खाली रहायचा तर कधी बॉल उसळी घेत होता. त्यामुळे आता अनेक वाद उद्भवल्याचं समोर येतंय.
