नागपूरच्या मुलीला विश्वविजेतेपद मिळाल्याचा आनंद नितीन गडकरींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. नितीन गडकरींनी मराठीमध्ये दिव्याचं अभिनंदन केलं. दिव्याने अंतिम फेरीत भारताच्याच कोनेरू हम्पीचा पराभव केला. 19 वर्षीय दिव्याच्या यशाचा आनंद संपूर्ण देश साजरा करत आहे. दिव्या बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. नागपुरात दिव्याच्या विजयानंतर आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला.
advertisement
काय म्हणाले गडकरी?
नितीन गडकरी यांनी दिव्याला तिच्या यशाबद्दल शुभेच्छा देऊन प्रोत्साहन दिले. नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉलमध्ये हसत हसत तिचे अभिनंदन केले.
व्हिडिओ कॉलवर दिव्या देशमुखचे अभिनंदन केल्यानंतर, नितीन गडकरी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, 'हा क्षण केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी प्रचंड अभिमान आणि आनंदाचा क्षण आहे. दिव्या आणखी उंची गाठत राहावी अशी माझी इच्छा आहे, कारण तिची ही उल्लेखनीय कामगिरी तरुणांसाठी खरी प्रेरणा आहे.'
नितीन गडकरी यांनी दिव्या देशमुख बुद्धिबळाची विश्वविजेती बनली तेव्हाचा क्षणही शेअर केला आहे. हा विश्वचषक जॉर्जियामध्ये खेळला गेला होता. भारतात परतल्यावर मुंबईसह नागपूरमध्ये दिव्या देशमुखचं स्वागत करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.