पाकिस्तानला सेमीफायनल गाठता येणार नाही
पाकिस्तानसाठी आजचा सामना महत्त्वाचा आहे. न्यूझीलंडविरुद्ध पावसामुळे त्यांना एकच पाईंट मिळाला. तर आता आजचा सामना गमावला तर 2 पाईंट्स हातातून जातील. त्यामुळे 3 पाईंट्स गेल्यानंतर फक्त 3 पाईंट्सच्या मदतीने पाकिस्तानला सेमीफायनल गाठता येणार नाही. तसेच आजच्या सामन्यात जर पावसाने हजेरी लावली तर दोन्ही संघांना 1-1 पाईंट मिळेल. पावसामुळे पाकिस्तान स्पर्धेत टिकू शकतं पण सेमीफायनलचं समीकरण किचकट असणार आहे.
advertisement
पाकिस्तानसाठी एक गुड न्यूज
पल्लेकेले येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज मॅच दरम्यान तापमान साधारणतः 19 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. यामुळे खेळाडूंना मैदानात अतिशय सुखद आणि थंड वातावरणात खेळता येईल. बॅट्समन आणि बॉलर दोघांसाठीही ही परिस्थिती पोषक असून, खेळाचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. या सामन्यात पावसाची शक्यता 13 टक्के असल्याचं हवामान खात्याकडून कळतंय. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही गुड न्यूज असेल.
सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी
दरम्यान, मॅच सुरू असताना आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे मैदानावर दृष्यमानता उत्तम असेल, ज्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि बॅट्समनना बॉलवर लक्ष केंद्रित करणं सोपं जाईल. हवामानातील हा स्पष्टपणा खेळाच्या निकालावर सकारात्मक परिणाम घडवू शकतो, कारण पावसाच्या अडथळ्याशिवाय मॅच पार पडेल. त्यामुळे पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी साधून आली आहे.
