TRENDING:

ENG vs WI : सलमान आगाने देव पाण्यात ठेवले! मॅचच्या 24 तास आधीच पाकिस्तानचं पॅकअप? दोन समीकरण सेमीफायनलमध्ये पोहचवणार

Last Updated:

Pakistan SemiFinal Qualification All Possible Scenario : पाकिस्तानला अद्याप सुपर 8 मध्ये एकही मॅच जिंकता आली नाहीये. याचाच फटका पाकिस्तान संघाला बसला असून आता सलमान आली आगा याला भलतंच टेन्शन आलंय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
Choose
News18 on Google
advertisement
ENG vs WI, T20 World Cup 2026 : एकीकडे टीम इंडिया सेमीफायनलच्या जवळ पोहोचत असताना पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा संघ सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर 8 मध्ये पाकिस्तानने जागा मिळवली खरी पण पाकिस्तानला अद्याप सुपर 8 मध्ये एकही मॅच जिंकता आली नाहीये. याचाच फटका पाकिस्तान संघाला बसला असून आता सलमान आली आगा याला भलतंच टेन्शन आलंय.
ENG vs WI Pakistan SemiFinal Qualification
ENG vs WI Pakistan SemiFinal Qualification
advertisement

इंग्लंडने जर न्यूझीलंडचा पराभव केला तरच...

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात उद्या सामना खेळवला जाणार आहे. श्रीलंका आधीच सेमीफायनलच्या रेसमधून बाहेर झाली असताना आता पाकिस्तानकडे एक संधी आहे. त्यासाठी पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्धचा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. पण पाकिस्तानला एवढ्यावरच भागणार नाही. पाकिस्तानला याठिकाणी इंग्लंडची साथ घ्यावी लागणार आहे. इंग्लंडने जर न्यूझीलंडचा पराभव केला तरच असं शक्य होणार आहे.

advertisement

जर न्यूझीलंड जिंकली तर न्यूझीलंडला...

आज इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना खेळवला जातोय. या सामन्यात जर न्यूझीलंड जिंकली तर न्यूझीलंडला थेट सेमीफायनलचं तिकीट मिळेल. पण जर इंग्लंड जिंकली तर पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे खुले राहतील. त्यासाठी इंग्लंडला मोठ्या मार्जिनने न्यूझीलंडला हरवावं लागेल तर पाकिस्तानला देखील मोठ्या मार्जिनने श्रीलंकेचा पराभव करावा लागणार आहे. पाकिस्तानसाठी नेट रनरेट महत्त्वाचा ठरणार आहे.

advertisement

पाकिस्तानसमोर एक रस्ता 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

दरम्यान, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द जरी झाला तरी देखील पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचता येणार नाही. न्यूझीलंडकडे आधीच तीन पाईंट्स आहेत. आणि पाकिस्तान तीन पाईंट्स पर्यतच पोहोचू शकते. त्यामुळे न्यूझीलंडचा पराभव हाच एक रस्ता पाकिस्तानसमोर आहे. एवढंच नाही तर न्यूझीलंडचा नेट रनरेट +3.050 असल्याने पाकिस्तानसमोर डबल अडचणी उभ्या राहिल्या आहेत. पाकिस्तानला +3.050 चा आकडा पार करणं अवघड नाही तर अशक्य असं दिसतंय.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
ENG vs WI : सलमान आगाने देव पाण्यात ठेवले! मॅचच्या 24 तास आधीच पाकिस्तानचं पॅकअप? दोन समीकरण सेमीफायनलमध्ये पोहचवणार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल