TRENDING:

T20 World Cup साठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, काव्या मारनच्या 13 कोटीच्या खेळाडूला डच्चू! नवा कॅप्टन कोण?

Last Updated:

England announce squad for T20 World Cup 2026 : फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत भारत आणि श्रीलंका या देशांत हा वर्ल्ड कप रंगणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंड संघाचा कॅप्टन असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
England Cricket team For T20 World Cup 2026 : पुढील वर्षी होणाऱ्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आपली जोरदार तयारी सुरू केली असून 15 सदस्यीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी टीमची धुरा एका युवा खेळाडूच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून हॅरी ब्रूक या टीमचा कॅप्टन असेल. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च 2026 या कालावधीत भारत आणि श्रीलंका या देशांत हा वर्ल्ड कप रंगणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंड संघाचा कॅप्टन असणार आहे.
England announce squad for the ICC Mens T20 World Cup 2026
England announce squad for the ICC Mens T20 World Cup 2026
advertisement

इंग्लंडचा नवा कॅप्टन कोण?

हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखालील या टीममध्ये फिल सॉल्ट, विल जॅक्स, बेन डकेट आणि टॉम बँटन यांसारख्या खेळाडूंवर बॅटिंगची जबाबदारी असेल. बॉलिंगमध्ये जोफ्रा आर्चर पेस अटॅक सांभाळेल, तर स्पिन डिपार्टमेंटमध्ये अनुभवी आदिल रशीद असणार आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा समावेश ग्रुप 'सी' मध्ये करण्यात आला असून त्यांच्यासोबत बांगलादेश, इटली, वेस्ट इंडिज आणि नेपाळ या टीम आहेत. तसेच काव्या मारनच्या 13 कोटीच्या खेळाडूला देखील डच्चू देण्यात आलाय.

advertisement

काव्या मारनच्या 13 कोटीच्या खेळाडूला डच्चू

भारतात होणाऱ्या या वर्ल्ड कप टीममध्ये एका अशा खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही, ज्याने आपल्या करिअरमध्ये फोर पेक्षा जास्त सिक्स मारले आहेत. स्फोटक बॅटर लायम लिविंगस्टन याला वर्ल्ड कपच्या टीममधून वगळण्यात आले आहे. लिविंगस्टनने 60 मॅचेसमध्ये 54 फोर आणि 59 सिक्स मारले आहेत, मात्र मार्च 2025 पासून तो टीमच्या बाहेरच आहे. त्याने आपला शेवटचा इंटरनॅशनल टी-ट्वेंटी सामना फेब्रुवारी 2025 मध्ये भारताविरुद्ध खेळला होता.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालथ, आगामी काळात 5000 जाणार? मार्केटमधून अपडेट समोर
सर्व पहा

टी-20 वर्ल्ड कपसाठी इंग्लंडचा संघ - हॅरी ब्रूक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, ब्रायडन कार्स, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल सॉल्ट, जोश टंग आणि ल्यूक वुड.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
T20 World Cup साठी इंग्लंडच्या टीमची घोषणा, काव्या मारनच्या 13 कोटीच्या खेळाडूला डच्चू! नवा कॅप्टन कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल