TRENDING:

Ben Stokes : डोळा सुजून बंद, चेहरा हिरवा-निळा, बेन स्टोक्सची अवस्था धक्कादायक, Photo तुम्ही पाहू शकणार नाही!

Last Updated:

इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्सला झालेल्या दुखापतीचा धक्कादायक फोटो समोर आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : इंग्लंडच्या टेस्ट टीमचा कर्णधार बेन स्टोक्सला झालेल्या दुखापतीचा धक्कादायक फोटो समोर आला आहे. बेन स्टोक्सच्या चेहऱ्याला क्रिकेट बॉल लागल्यानंतर त्याचा उजवा डोळा पूर्णपणे मिटला गेला असून तो हिरवा निळा झाला आहे, तर त्याच्या ओठालाही जखम झाली आहे, तसंच नाकालाही दुखापत झाल्यामुळे त्याने नाकामध्येही कापूस घातला आहे. बेन स्टोक्सने स्वत: इन्स्टाग्रामवर त्याला झालेल्या दुखापतीचा फोटो शेअर केला आहे.
डोळा सुजून बंद, चेहरा हिरवा-निळा, बेन स्टोक्सची अवस्था धक्कादायक, Photo तुम्ही पाहू शकणार नाही!
डोळा सुजून बंद, चेहरा हिरवा-निळा, बेन स्टोक्सची अवस्था धक्कादायक, Photo तुम्ही पाहू शकणार नाही!
advertisement

डरहमच्या इनडोअर क्रिकेट फॅसिलिटीमध्ये स्टोक्सला ही दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. बॅटिंग किंवा बॉलिंग नाही तर एका बाजूला उभा असताना स्टोक्सला बॉल लागल्याची माहिती समोर आली आहे. 'तुम्ही क्रिकेट मॅचची अवस्था पाहायला हवी', असं कॅप्शन बेन स्टोक्सने या फोटोला दिलं आहे.

मागच्या महिन्यात ऍशेसमध्ये 4-1 ने पराभव झाल्यानंतर 34 वर्षांचा बेन स्टोक्स ऑस्ट्रेलियामधून इंग्लंडमध्ये परतला आहे. ऍशेसमधल्या लाजिरवाण्या कामगिरीनंतर कर्णधार स्टोक्स आणि कोच ब्रॅन्डन मॅकल्लम यांच्या भवितव्याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्ड लवकरच निर्णय घेणार आहे.

advertisement

2010-11 नंतर ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच ऍशेस जिंकण्याच्या इराद्याने इंग्लंडची टीम गेली होती, पण पहिल्या 3 सामन्यांमध्ये 11 दिवसांमध्येच पराभव झाल्यानंतर इंग्लंडच्या हातातून सीरिज गेली. यानंतर एमसीजीमध्ये झालेल्या बॉक्सिंग डे च्या सामन्यात इंग्लंडला विजय मिळाला, पण सिडनीमध्ये इंग्लंडला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का बसला.

ऍशेसमध्ये फक्त कॅप्टन्सीच नाही तर बॅटिंगमध्येही स्टोक्सने निराशा केली. ऍशेसमध्ये त्याने 10 इनिंगमध्ये 18.40 च्या सरासरीने रन केल्या. तर बॉलिंगमध्ये त्याने 25.13 च्या सरासरीने 15 विकेट घेतल्या. ऍशेसमध्ये बेन स्टोक्सच्या कॅप्टन्सीवरही टीका झाली. बॉलिंग आणि फिल्डिंगमध्ये केलेल्या बदलांवर माजी क्रिकेटपटूंनी स्टोक्सवर निशाणा साधला. सीरिज संपल्यानंतर स्टोक्सनेही आपल्याकडून मोठ्या चुका झाल्याचं मान्य केलं.

advertisement

ऍशेस सीरिजदरम्यान इंग्लंडच्या खेळाडूंनी मैदानाबाहेर केलेल्या कृत्यांमुळेही वाद निर्माण झाला होता. इंग्लंडच्या खेळाडूंनी सीरिजदरम्यान मद्यपान केल्याची वृत्त प्रसिद्ध झाली होती.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात तेजी, तुरीने ओलांडला 9 हजाराचा टप्पा, कापसाला काय मिळाला भाव?
सर्व पहा

इंग्लंडमध्ये परतल्यानंतर आता बेन स्टोक्स 4 जूनपासून लॉर्ड्सवर न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजसाठी मैदानात उतरेल. चेहऱ्याची दुखापत गंभीर नसेल तर स्टोक्स डरहमकडून काऊंटी चॅम्पियनशिपमध्येही खेळताना दिसू शकतो.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ben Stokes : डोळा सुजून बंद, चेहरा हिरवा-निळा, बेन स्टोक्सची अवस्था धक्कादायक, Photo तुम्ही पाहू शकणार नाही!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल