शिवरामाकृष्णनचे आरोप
मी बीसीसीआयच्या कॉमेंट्री पॅनलमधून निवृत्ती घेतली आहे, अशी घोषणा शिवरामाकृष्णन याने सोशल मीडियाच्या माध्यमातून केली. 'मला 23 वर्षांमध्ये टॉस आणि प्रेझेंटेशनच्या वेळी संधी दिली गेली नाही. आज नवीन लोक टॉस आणि पिच रिपोर्ट करत आहेत', असा आरोप शिवरामाकृष्णनने केला.
शिवरामाकृष्णनने त्याच्या वक्तव्यामध्ये कुठेही थेटपणे बीसीसीआयवर आरोप केले नाहीत, पण त्याच्या पोस्टवर एका व्यक्तीने तुझा रंग असा असल्यामुळे झालं असेल, अशी कमेंट केली, या कमेंटवर शिवरामाकृष्णन यांनी सहमत असल्याचं सांगितलं, त्यामुळे हा वाद वाढला.
advertisement
भारताचा माजी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विननेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. लक्ष्मण शिवरामाकृष्णन यंदा आयपीएलमध्ये कॉमेंट्री करताना दिसणार नाही, याबद्दल अश्विनने खेद व्यक्त केला. शिवरामाकृष्णनच्या या आरोपानंतर काही यूजर्सनी त्याला पाठिंबा दिला तर काहींनी त्याला ट्रोल करायला सुरूवात केली.
लक्ष्मण शिवरामाकृष्णन हा लेग स्पिनर होता, त्याने भारताकडून 9 टेस्ट मॅचमध्ये 26 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने 16 वनडे सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 15 विकेट आहेत. 1983-1987 दरम्यान शिवरामाकृष्णन टीम इंडियाकडून खेळला.
