खरं तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेला आजपासून सूरूवात झाली आहे. या स्पर्धेत आज उत्तर प्रदेश विरूद्ध गोवा या दोन संघात सामना पार पडला.या सामन्यात गोव्याकडून खेळताना अर्जुन तेंडुलकरला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. अर्जून सोबत ईशान गाडेकर सलामीला उतरला होता.यावेळी ईशान गाडेकर 16 धावावर बाद झाला तर अर्जून तेंडुलकर 28 धावांवर बाद झाला. या खेळी दरम्यान त्याने 4 खणखणीत चौकार मारले होते. अर्जुनने यावेळी 127 च्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या होत्या.
advertisement
या दोन्ही खेळाडूनंतर अभिनव तजरानाने गोव्याचा डाव सावरत 72 धावांची वादळी खेळी केली.या खेळीत त्याने 6 षटकार आणि 4 चौकार लगावले आहेत तजराना व्यतिरीक्त इतर कोणाला मोठ्या धावा करता आल्या नाही.त्यामुळे गोवा 20 ओव्हरमध्ये 9 विकेट गमावून 172 धावा करू शकली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशसमोर 173 धावांचे आव्हान होते.
गोव्याने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तर प्रदेशकडून आर्यन जुयालने 93 धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 11 चौकार लगावले होते. त्याला समीर रिझ्वीने 38 धावा करून साथ दिली.त्यामुळे उत्तर प्रदेशने 18.2 ओव्हरमध्ये हे लक्ष्य पु्र्ण करत हा सामना 6 विकेटसने जिंकला आहे.
