व्हिडीओमध्ये इंझमाम उल हक म्हणतो की, आमच्याकडे एक खोली होती जिथे प्रार्थना केली जायची. मौलाना तारिक जमील सायंकाळी आम्हाला भेटायला यायचे आणि नमाज शिकवायचे. काही दिवसांनी इरफान पठाण, मोहम्मद कैफ आणि जहीर खानही यायला लागले. चार इतर भारतीय क्रिकेटर बसले आणि आम्ही बघतच राहिले. हरभजनला तारिक जमील हे मौलाना असल्याचं माहिती नव्हतं. तेव्हा हरभजनने म्हटलं होतं की मी यामुळे प्रभावित झालो आणि मला त्यांच्या शिकवणीचं पालन करायची इच्छा आहे.
advertisement
हरभजन सिंगने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या इंझमाम उल हकच्या या व्हिडीओवर संताप व्यक्त केलाय. हरभजनने म्हटलं की, ही कुठली नशा, काय पिऊन बोलत आहे? मी भारतीय असल्याचा अभिमान आहे आणि शीख असल्याचाही अभिमान आहे. हे बकवास लोक काहीही बरळतात.
पाकिस्तानचा क्रिकेटपटू अब्दुल रज्जाकने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या क्रिकेट संघाच्या कामगिरीवर टीका करताना ऐश्वर्या रायचं उदाहरण चुकीच्या पद्धतीने दिलं होतं. यावरून सध्या सोशल मीडियावर अब्दुल रज्जाकवर टीका केली जातेय. त्यातच आता पुन्हा इंझमाम उल हकचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याच्यावरही टीकेचा भडिमार केला जात आहे.