SMAT 2025, Gujarat vs Baroda : येत्या 9 डिसेंबर 2025 पासून भारत आणि साऊथ आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी20 मालिकेला खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या याची संघात निवड झाली आहे.दरम्यान या मालिकेआधी हार्दिक पांड्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसतोय. या स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या टीमने खतरनाक खेळी केली आहे. या खेळीच्या बळावर हार्दिकच्या संघाने अवघ्या 40 बॉलमध्ये सामना जिंकला आहे.
advertisement
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आज गुजरात आणि बरोडा या दोन संघात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात संघ प्रथम फलंदाजी करताना 73 धावांवर ऑलआऊट झाला होता.त्यामुळे गुजरातने दिलेल्या या 74 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याच्या बरोडा टीमने अवघ्या 40 बॉलमध्ये हे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.
बरोडाकडून शाश्वत राऊत आणि विष्णु सोलंकी मैदानात सलामीला उतरले होते. यावेळी विष्णु सोलंकीने 27 धावांची खेळी केली होती. त्याच्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात आला होता. हार्दिक ज्यावेळेस मैदानात आला तेव्हा संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 10 ते 15 धावा हव्या होत्या.त्यावेळेस हार्दिक पांड्या अवघ्या 10 धावा करून करून बाद झाला. त्याच्यानंतर शाश्वत राऊत 30 धावा करून नाबाद राहिला तर जितेश शर्मा 1 धावा करून नाबाद राहिला.अशाप्रकारे बरोडा संघाने 6.4 ओव्हरमध्ये 74 धावांचे लक्ष्य गाठत 8 विकेटसने हा सामना जिंकला आहे. गुजरातकडून रवि बिश्नोने 2 विकेट घेतल्या होत्या.
तर प्रथम फलंदाजी करताना गुजरात 73 धावांवर ऑलआऊट झाली होती. गुजरातकडून आर्या देसाई सर्वाधिक 22 धावा ठोकल्या होत्या. त्याच्यासोबत हेमांग पटेल 13 धावा केल्या होत्या. बाकी उरलेले 8 खेळाडू हे एकेरी धावसंख्या करून बाद झाले. बडोदाकडून राज लिंबानी सर्वाधिक 3, अतित शेठने 2 तर हार्दिक पांड्या, रसिख सलाम आणि कृणाल पंड्याने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती.
