काय म्हणाला हार्दिक पांड्या?
कधीकधी जेव्हा तुम्ही जखमी होता तेव्हा आयुष्य तुमची परीक्षा घेतं, ते तुम्हाला मानसिकदृष्ट्या स्वतःवर शंका घेण्यास भाग पाडतं. पण त्यासाठी मी माझ्या प्रियजनांचे आभार मानू इच्छितो. या खास प्रसंगी माझ्या खास व्यक्तीला मेन्शन केलं पाहिजे. ती माझी पार्टनर आहे. खूप चांगल्या गोष्टी घडल्या. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून खूप काही चांगल्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहे.
advertisement
तुझ्यासारखा कोणी नाही, राजा...
हार्दिक पांड्याच्या वक्तव्यावर महिका शर्माने देखील लगेच प्रतिक्रिया दिली. बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिकाने कमेंट केली. तिची कमेंट सध्या चर्चेचा विषय आहे. तुझ्यासारखा कोणी नाही, राजा... असं महिका शर्मा म्हणाली. त्यावेळी तिने हार्दिक पांड्याची पोझचा इमोजी देखील तिथं शेअर केला.
सोशल मीडिया अकाउंटवर फोटो
दरम्यान, एनसीएमधून आल्यानंतर हार्दिक पंड्या आणि माहिका शर्मा यांना अलिकडेच अनेक वेळा एकत्र पाहिले गेलं आहे. हार्दिक पांड्याने स्वतः त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर माहिकासोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशीपवर सोशल मीडियावर चर्चा होतच होती.
कोण आहे महिका शर्मा?
माहिका शर्मा ही एक प्रसिद्ध मॉडेल आहे. महिलाने अनेक प्रसिद्ध फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केल्याची माहिती आहे. तिने अनेक संगीत व्हिडिओ आणि लघुपटांमध्ये देखील काम केल्याची माहिती आहे. तसेच अनेक प्रसिद्ध फॅशन मासिकामध्ये तिचं उगवती स्टार म्हणून उल्लेख होता. माहिका पांड्यासोबतच्या नात्यानंतर अधिक चर्चेत आलीय. तिचे सोशल मीडियावर 350000 फॉलोवर्स आहेत.
