ड्रेसिंग रुममधला पांड्याचा व्हिडीओ
आयुष्यात दोन गोष्टी असतात, तुमची भीती वाढत असते आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमची ताकद दाखवायची असते. मी दुसरा पर्याय निवडला, असं हार्दिक पांड्या म्हणाला. तसेच ड्रेसिंग रुममधला पांड्याचा व्हिडीओ समोर आलाय. त्यात पांड्याने खेळाडूंना उत्साही राहण्याचं आवाहन केलं. आयुष्यात अशा फिलिंग खुप कमीवेळा येतात. त्यामुळे अशा गोष्टी इन्जॉय करा, असं हार्दिक पांड्या सेमीफायनलनंतर म्हणाला.
advertisement
मला स्टंपवरच थ्रो करायचा होता पण...
मला फक्त एका बॅटरची विकेट पाहिजे होती, ते म्हणजे इंग्लंडचा बेथल याची... बेथलने चांगली बॅटिंग केली होती. बेथलला रनआऊट करताना मला स्टंपवरच थ्रो करायचा होता. पण थ्रो थोडा बाजूला गेला पण आमचं काम झालं. मी जास्त अॅक्शनमध्ये होतो कारण माझा मुलगा आणि महिका तिथंच होती, असं पांड्या म्हणाला.
मुलगा अगस्त्य आणि माहिका स्टँडवर...
दरम्यान, माझा मुलगा अगस्त्य आणि माहिका स्टँडवर माझ्याकडे पाहत होते. त्यामुळे माझ्याकडून त्यांना अपेक्षा होत्या. त्यामुळे मला कामगिरी करणं गरजेचं होतं. मला त्यांना दाखवायचं होतं की, मी किती उत्साही आहे, असं हार्दिक पांड्या म्हणाला. हार्दिक पंड्याचा सध्याचा फॉर्म पाहता न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल मॅचमध्ये त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. विशेषतः मधल्या ओव्हर्समध्ये विकेट काढण्याची त्याची क्षमता कॅप्टन सूर्यकुमार यादवसाठी फायदेशीर ठरत आहे.
